तरुण भारत

यावर्षी कित्तूर उत्सव दोन दिवस

23 ऑक्टोबरपासून उत्सवाला प्रारंभ

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

ऐतिहासिक कित्तूर राणी चन्नम्मा उत्सव यावषी दोन दिवसांचा करण्यात येणार आहे. या काळात विविध व्याख्याने तसेच स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाचे नियम पाळत हा उत्सव साजरा केला जाणार आहे. या उत्सवासाठी सरकारने 1 कोटी रुपये निधी दिला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते या कित्तूर उत्सवाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोमवारी झालेल्या या पत्रकार परिषदेमध्ये कित्तूरचे आमदार महांतेश दोड्डगौड, अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, कन्नड आणि सांस्कृतिक विभागाच्या विद्यावती बजंत्री, यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. कित्तूर उत्सव दरवषीच मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. मात्र मागीलवषी कोरोनामुळे अत्यंत साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा केला होता. मात्र यावषी दोन दिवसांचा हा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.  23 ऑक्टोबर रोजी या उत्सवाचे कित्तूर येथे उद्घाटन होणार आहे. तर 24 ऑक्टोबर रोजी या उत्सवाची सांगता होणार आहे. कित्तूर येथील किल्ला येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवासाठी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, पालकमंत्री गोविंद कारजोळ, मंत्री उमेश कत्ती, मुरगेश निराणी यांच्यासह इतर मंत्री व आमदार उपस्थित राहणार आहेत.

या उत्सवानिमित्त सर्व तालुक्मयांमध्ये राणी कित्तूर चन्नम्मा यांची ज्योत फिरविली जाणार आहे. सोमवार दि. 18 रोजी त्याचे उद्घाटन झाले असून आता विविध तालुक्मयांना भेटी दिल्या जाणार आहेत. त्यानंतर 23 रोजी कित्तूर येथे ज्योत येणार असून ज्योत आल्यानंतर या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

वेदांत सोसायटीतर्पे डॉक्टरांचा सन्मान

Patil_p

आरपीडी कॉर्नर येथील ‘तो’ धोकादायक पथदीप हटवा

Amit Kulkarni

जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या अध्यक्षपदी संजय पाटील

Rohan_P

भिक्षा वाढा, आम्हीसुद्धा सण साजरा करतो

Amit Kulkarni

कडोलीत बहुमतासाठी करावी लागणार कसरत

Patil_p

आरपीडी-बसवेश्वर चौकातील ट्रफिक सिग्नल सुरू

Patil_p
error: Content is protected !!