तरुण भारत

ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी योग्य मार्गदर्शकाची. घरज

आपल्या जीवनात अनेक समस्यांना सामोरे जाणारे लोक बघत असतो. ते जेंव्हा संकटांना सामोरे जातात. तेंव्हा कोणी तरी आपल्याला मुक्त करावे, असे त्यांना वाटते. यासाठी ते ईश्वराचा धावा करतात आणि ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी गरज असते ती योग्य मार्गदर्शकाची. समाजाची ही गरज प्रेशित मुहम्मद यांनी पूर्ण केली. अवघ्या 40 वर्षांत त्यांचे मार्गदर्शन एका मेंढपाळाच्या वसतीतून पूर्ण जगभर पसरले. त्यांचा प्रामाणिकपणा हा जगभरातून अरबस्थानात येणाऱया उद्योजकांना, व्यापाऱयांना मोहीत करत असे व त्यांच्या मार्गदर्शनाचा गोडवा ते आपापल्या प्रदेशात घेऊन जात.

मानवी जीवनासंबंधी सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, कौटुंबिक, शैक्षणिक, मानसिक, शारीरिक अशा सर्व प्रकारचे मार्गदर्शन प्रेषित मुहम्मद यांनी आपल्या जीवनात क्षणोक्षणी केले. मुस्लिम समुदायाचा पवित्र ग्रंथ कुराण नंतर ‘हद्दीस’ला अधिक महत्व दिले गेले. ज्यामध्ये प्रेषित मुहम्मदनी सांगितलेल्या मार्गदर्शन संकलन आहे. भूतकाळातील घटना असो, वर्तमानातील घडामोडी असो किंवा भविष्यातील आक्हाने असो या मार्गदर्शनातून नेहमीच समाधानी उत्तरे आपण प्राप्त करु शकतो.

Advertisements

माणूस जीवनात अनेकदा चुकत असतो. परंतु चूक झाल्यावर तो एका मार्गदर्शकाकडे धाव घेता. जेणेकरुन झालेल्या चुकीबद्दल पश्चताप करावा व त्याची पुनरावृत्ती होवू नये. अशा सर्वांना मुहम्मद यांनी मार्गदर्शन केले.

त्यांचे मार्गदर्शन कुराणवर आणि त्यांच्या जीवन चरित्रावर आधारीत ‘हद्दीस’च्या स्वरुपात उपलब्ध आहे. प्रसिध्द कवी सुरेश भट्ट म्हणतात ‘उजाड वैरान वाळवंटी, खळाळणारा झरा मुहम्मद, जगातल्या दीन दुखीतांचा अखेरचा आसरा मुहम्मद’.

                                    – संदीप सरतापे-हिंगोला

Related Stories

कर्नाटक: रुग्णालयांमधील कोरोना रुग्णांच्या आहारात केले बदल

Abhijeet Shinde

शिवानी भोसले यांना आंतरराज्य पुरस्कार जाहीर

Patil_p

सदलग्यात अरण्यसिद्धेश्वर परिसरात अतिक्रमण नको धनगर समाजाची मागणी

Rohan_P

तालुक्यात घुमला संयुक्त महाराष्ट्राचा गजर

Patil_p

समतावादी समाजरचनेच्या दिशेने भारताची वाटचाल

Amit Kulkarni

सिद्धी महिला मंडळातर्फे दीपोत्सवाचे आयोजन

Omkar B
error: Content is protected !!