तरुण भारत

फास्टफूड दुकानांबाबत मनपाकडे तक्रार

परिसरातील नागरिकांना दुकानांचा त्रास

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

वडगाव परिसरात रस्त्यावर व्यवसाय करणाऱयांची संख्या वाढली आहे. सोनार गल्ली कॉर्नरवर सुरू करण्यात आलेल्या फास्टफूड दुकानांचा त्रास परिसरातील व्यावसायिक आणि रस्त्यावरून ये-जा करणाऱयांना होत आहे. त्यामुळे याबाबत महापालिका आयुक्तांकडे तक्रार नोंदविण्यात आली असून खाद्यपदार्थ उघडय़ावर बनवू नयेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

रस्त्याशेजारी सुरू करण्यात आलेल्या फास्टफूड दुकानांत खाद्यपदार्थ उघडय़ावर बनविण्यात येत आहेत. त्यामुळे खाद्यपदार्थ बनविताना वाऱयामुळे उडणारी मिरची पावडर आणि फोडणीचा वास सर्वत्र पसरत आहे. त्यामुळे परिसरातील अन्य व्यावसायिकांना आणि ये-जा करणाऱया नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे याबाबत महापालिका आयुक्त रूदेश घाळी यांना निवेदन देऊन फास्टफूडचे खाद्यपदार्थ उघडय़ावर बनवू नयेत याकरिता आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदनावर परिसरातील व्यावसायिकांच्या सहय़ा आहेत.

Related Stories

पॅरा टेबलटेनिस स्पर्धेसाठी संजीव हम्मण्णावर फ्रान्सला रवाना

Amit Kulkarni

पिण्याच्या पाण्यासाठी पाच्छापुरात घागर मोर्चा

Patil_p

तालुक्यात ग्रा. पं. निवडणुकीच्या हालचाली गतिमान

Patil_p

अत्यावश्यक सेवा वगळता वाहनांना प्रवेशबंदी

Patil_p

महाराष्ट्र एकीकरण समितीचे कोविड विलगिकरण केंद्र उद्यापासून बेळगावकरांच्या सेवेत

Patil_p

रेल्वेचे काहीअंशी खासगीकरण ग्राहकांच्या फायद्याचेच

Patil_p
error: Content is protected !!