तरुण भारत

जन्म-मृत्यू दाखले सेवासिंधू केंद्रात उपलब्ध

मनपाकडून यादी प्रसिद्ध

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

जन्म-मृत्यू दाखल्यांची नोंद ई-जन्म या ऑनलाईन प्रणालीवर होत असून शहरातील विविध सेवा केंद्रांवर दाखले देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शहरात 40 हून अधिक सेवा केंद्रांवर जन्म-मृत्यू दाखले देण्याची सेवा कार्यान्वित झाली आहे. या सेवा केंद्रांची यादी आणि संपर्क क्रमांक महापालिका प्रशासनाने प्रसिद्ध केले आहेत.

 जन्म-मृत्यू दाखले मिळविण्यासाठी महापालिका कार्यालयात धाव घ्यावी लागत असून या ठिकाणी गर्दी होत आहे. काहीवेळा नोंद झाली नसल्यास नागरिकांना धावपळ करावी लागते. तसेच महापालिका कार्यालयात दाखले घेण्यासाठी रांगा लागत असल्याने नागरिकांना ताटकळत थांबावे लागत असते. नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी आता सेवासिंधू सेवा केंद्रावर दाखले देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शहरात 60 हून अधिक सेवा केंद्रे असून यापैकी दाखला मिळणाऱया सेवा केंद्रांचे नाव व चालकांच्या मोबाईल क्रमांकांची यादी मनपा कार्यालयातील जन्म-मृत्यू कक्षासमोर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 40 हून अधिक सेवा केंद्रांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून या केंद्रांवर नागरिकांना जन्म-मृत्यू दाखले उपलब्ध होणार आहेत.

पण नावनोंदणी किंवा चुकीच्या दुरुस्तीसाठी नागरिकांना महापालिका कार्यालयातच अर्ज करावे लागणार आहेत. सेवा केंद्रावर केवळ दाखले उपलब्ध केले जातील. दाखल्यात कोणत्याही प्रकारच्या चुका असल्यास त्याची दुरुस्ती करण्याचा अधिकार केवळ महापालिकेला आहे.

Related Stories

वडगाव येथील महिला तीन मुलांसह बेपत्ता

Patil_p

रेल्वे उड्डाणपूलावर अंधार

Patil_p

गृहमंत्र्यांनी घेतला अधिवेशन सुरक्षेचा आढावा

Amit Kulkarni

चांगळेश्वरी हायस्कूलतर्फे के. बी. निलजकर यांना श्रद्धांजली

Amit Kulkarni

कोळपणीच्या कामालाही सुरुवात

Omkar B

संकेश्वर 28 दिवस सीलडाऊन

Patil_p
error: Content is protected !!