तरुण भारत

रेल्वे कर्मचाऱयांच्या चुकीचा प्रवाशांना फटका

रेल्वे चुकीच्या प्लॅटफॉर्मवर येण्याची केली घोषणा

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

बेळगाव रेल्वेस्थानकावर चुकीच्या प्लॅटफॉर्म क्रमांकाची घोषणा करण्यात आल्याने याचा फटका प्रवाशांना बसला. येणारी रेल्वे दुसऱया प्लॅटफॉर्मवर येणार असल्याची घोषणा करताच प्रवाशांची धावपळ झाली. जिना चढून सर्व प्रवाशांना दुसऱया प्लॅटफॉर्मवर जावे लागले. परंतु रेल्वे पहिल्याच प्लॅटफॉर्मवर आल्याने प्रवाशांनी रेल्वेस्थानकावर आपला रोष व्यक्त केला.

 सध्या बेळगाव रेल्वेस्थानकाच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्म क्र. 2 चे रूळ काढून दुरुस्ती केली जात आहे. तसेच रेल्वे कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार याची माहिती देणारे बोर्ड काढून ठेवण्यात आले आहेत. रेल्वे येणार असल्याची घोषणा करणाऱया व्यक्तीने चुकीच्या प्लॅटफॉर्मची घोषणा केली. यामुळे प्रवाशांची धावपळ झाली. रेल्वे स्थानकात दाखल होत असताना चुकीची घोषणा केल्यामुळे प्रवाशांची धावपळ झाली. जिन्यावरून चढून जाण्यासाठी एकाचवेळी गर्दी झाली. महिला व वृद्धांचे हाल झाले. यातील काही प्रवाशांनी रेल्वेच्या वरि÷ अधिकाऱयांकडे तक्रार करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Related Stories

बॉडिफिट गराज – निरोगी व सुदृढ शरिरसंपदेचे दालन

Patil_p

सरकारी पदवी महाविद्यालयातील नवीन खोल्यांचे उद्घाटन

Amit Kulkarni

विजापूर जिह्यातील मजुरांची वैद्यकीय तपासणी

Patil_p

तलावात बुडून दोघा जणांचा मृत्यू

Amit Kulkarni

कोरोनाच्या सावटाखाली आजपासून विधिमंडळ अधिवेशन

Patil_p

उंटांवर बसून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Omkar B
error: Content is protected !!