तरुण भारत

हेस्कॉमचा गलथान कारभार कर्मचाऱयांच्या जीवावर

कलईगार गल्ली येथे लाईनमन गंभीर जखमी : भरतीच नसल्याने कर्मचाऱयांवर वाढला भार

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

मागील काही वर्षांपासून हेस्कॉममध्ये नवीन कर्मचाऱयांची भरती करण्यात आलेली नाही. त्यामुळे आहे त्याच कर्मचाऱयांवर काम निभावून न्यावे लागत आहे. याचाच परिणाम रविवारी कलईगार गल्ली येथे काम करणारा कर्मचारी ट्रान्सफॉर्मरवरून पडून गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे कामगारांचे जीव जाण्यापूर्वी कामगार भरती करण्याची मागणी होत आहे.

रविवारी कामत गल्ली येथील कलईगार गल्ली येथे हेस्कॉमचे ज्युनिअर लाईनमन श्रीधर डुकरे दुरुस्तीसाठी ट्रान्सफॉर्मरवर चढले होते. परंतु त्यावेळी त्यांचा तोल जावून ते जमिनीवर कोसळले. यामध्ये त्यांच्या डोक्मयाला जबर दुखापत झाली. त्यांना तात्काळ खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्मयावर शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु अद्यापही त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

हेस्कॉममध्ये कामगार भरती झाली नसल्याने उर्वरित कामगारांवर भार वाढला आहे. भरती प्रक्रिया राबवूनदेखील अद्याप अंतिम नेमणुका देण्यात आल्या नसल्याने कर्मचाऱयांची कमतरता आहे. त्यामुळे आहे त्या कर्मचाऱयांना अधिकची कामे करावी लागत आहेत. दुपारपर्यंत डिस्कनेक्शन करून त्यानंतर दुरुस्तीची कामे कर्मचाऱयांना करावी लागत आहेत. त्यामुळे कर्मचाऱयांवरचा भार दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

सुरक्षा साहित्य वापरूनच दुरुस्तीची कामे करा….

गांधीनगर भागातील एसओ-3 या भागामध्ये गांधीनगरपासून अलारवाडपर्यंतचा परिसर येतो. या भागासाठी 40 कर्मचाऱयांची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात मात्र केवळ 14 कर्मचारी या ठिकाणी कामावर आहेत. केपीटीसीएल कर्मचारी युनियनचे सेपेटरी मारुती दोडमनी यांनी सोमवारी सकाळी शहर उपविभाग कार्यालयात जाऊन सर्व लाईनमनची बैठक घेतली. सुरक्षा साहित्य वापरूनच दुरुस्तीची कामे करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Related Stories

गोकाक, मुडलगीला निवडणूक अधिकाऱयांची भेट

Amit Kulkarni

केदनूर येथील काटलक्ष्मी देवीची यात्रा उद्यापासून

Amit Kulkarni

शहर परिसरात रंगपंचमी साधेपणाने

Amit Kulkarni

बस्तवाडातील मराठी शाळेची तोडफोड

Amit Kulkarni

तरुणाने मोडले तब्बल 72 वेळा वाहतूकीचे नियम

Patil_p

खानापूर तालुक्यातील ऊस उत्पादक अडचणीत

Patil_p
error: Content is protected !!