तरुण भारत

राकसकोप जलाशय अद्यापही तुडुंबच

सोमवारी पाणीपातळी 2475 फूट : दरवाजांवरील पत्रे हटविण्याची मागणी

वार्ताहर /तुडये

Advertisements

बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱया राकसकोप जलाशयातील पाणीपातळी परतीच्या पावसामुळे तुडुंबच राहिली आहे. सोमवारी सकाळी जलाशयाची पाणीपातळी 2475.70 फूट इतकी होती. यावषी राकसकोप जलाशयाच्या काठावरील पिकांतून पाणी जाणार नाही, याची खबरदारी घेण्याची जबाबदारी जलाशय व्यवस्थापनावर आल्याने पाणीपातळी ही 2476 फुटाखालीच ठेवण्यात आली. पाणीपातळीत वाढ होताच शेतकरी जलाशयाकडे येऊन तक्रार करत असल्याने जलाशयाची मागील चार वर्षांपासून असलेली 2479 फुटावरील पाणीपातळी कमी करावी लागली आहे.

सप्टेंबरमध्ये 336 मि. मी. पाऊस झाला आहे. यावषी एकूण 2436 मि. मी. पाऊस झाला आहे. पाणीसाठा समाधानकारक असल्याने यावषी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहणार आहे. बेळगाव शहराला वाढीव पाण्याची गरज पाहून शहर पाणीपुरवठा मंडळाने जलाशयाच्या 2475 फूट पाणीपातळीत दरवषी फुटाने वाढ करत पाणीपातळी 2480 फुटापर्यंत वाढवली. ही वाढ करण्यासाठी जलाशयाच्या सहा वेस्टवेअरच्या दरवाजांवर दरवषी फूट-दीड फूट पत्रे वेल्डिंगने बसविण्यात आले आहेत. परिणामी पाणीपातळीत पाच फुटाने वाढ झाल्याने तुडयेसह मळवी, राकसकोप, इनाम बडस, बेळवट्टी, बाकमूर येथील शेतकऱयांच्या जलाशयाच्या काठावरील असलेल्या जमिनींमधील पिकांतून पाणी साचल्याने मोठे नुकसान झाल्यानंतर मागील वर्षापासून शेतकरी आक्रमक बनले आहेत. त्यामुळे पाणीपातळी कमी करण्यात आली. मात्र, पत्रे तसेच राहिल्याने पावसाळय़ात जलाशय तुडूंब झाल्यानंतर सहाही दरवाजे सहा फुटाने उघडण्यात आल्याने मार्कंडेय नदीला 2020 व 2021 या दोन्ही वषी पूर आला होता. अनेक मार्ग बंद पडले होते. जलाशय स्थापनेपासून अशी पूरमय परिस्थिती वर्षाकाठी 3500 ते 4500 मि. मी. पाऊस पडूनही निर्माण झाली नव्हती. त्यामुळे सहा दरवाजांवर बसविण्यात आलेले पत्रे त्वरित हटवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

Related Stories

मराठीच्या डिजिटल माध्यमाला स्वीकारा

Patil_p

फोटो व्हिडिओग्राफर्सच्या नूतन कार्यकारिणीची निवड

Amit Kulkarni

नरवीर चषक स्पर्धेत फॉरेव्हर संघाला जेतेपद

Amit Kulkarni

सागर बीएड् कॉलेजचा निकाल 100 टक्के

Patil_p

कोरोना रुग्णांवर एच-1 एन-1 चे उपचार

Patil_p

कचेरी गल्ली येथे दीड महिन्यापासून पाणीगळती

Amit Kulkarni
error: Content is protected !!