तरुण भारत

‘डिफेक्टिव्ह सायलेन्सर’ विरुद्ध पोलिसांची मोहीम

सोमवारी 11 दुचाकी केल्या जप्त, कडक कारवाईसाठी आरटीओकडे सोपविणार

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर असणारी वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. वाहतूक उत्तर विभाग पोलिसांनी सोमवारी 11 दुचाकी जप्त केली असून ही सर्व वाहने आरटीओकडे कारवाईसाठी सोपविण्यात येणार आहेत.

गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी व त्यांच्या सहकाऱयांनी सोमवारी दिवसभर वेगवेगळय़ा ठिकाणी डिफेक्टिव्ह सायलेन्सर असणारी वाहने अडवून त्यांची तपासणी केली. दिवसभरात 11 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून यामध्ये बुलेट व यामाहची संख्या अधिक आहे. केवळ दंडात्मक कारवाई करून वाहने सोडण्यापेक्षा कठोर कारवाईसाठी आरटीओंकडे ही सर्व वाहने सोपविण्यात येणार आहेत.

यासंबंधी पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्याशी संपर्क साधला असता कर्कश आवाज करणाऱया सायलेन्सरमुळे विद्यार्थी, रुग्ण, ज्येष्ट नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळेच आपण अशा डिफेक्टिव्ह सायलेन्सर असणाऱया वाहनांविरुद्ध मोहीम राबविली आहे. ही मोहीम सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

लसीकरणाचा घोळ कायम

Amit Kulkarni

निपाणीत गुटख्याचा ‘काळाबाजार’

Patil_p

सत्ता ब प्रकरणी ज्येष्ठ नागरिकांचे धरणे आंदोलन

Patil_p

शारदोत्सव सुवर्णमहोत्सवानिमित्त ‘हेरिटेज वॉक’

Amit Kulkarni

स्मार्ट सिटीच्या कामांमुळे धुरळा उडून वाहनचालक हैराण

Amit Kulkarni

आत्मभान सदैव जागे असणे हे खरे सौंदर्य!

Omkar B
error: Content is protected !!