तरुण भारत

जिल्ह्यात कोरोनाचा ‘हत्ती गेला शेपूट राहिलंय’

अचूक बातमी “तरुण भारत”ची, मंगळवार 19 ऑक्टोबर 2021, स. 11.00

● नवव्या दिवशीही वाढ 100 च्या खाली
● सोमवारी रात्री अहवालात 74 बाधित
● तीन हजार 65 जणांची तपासणी
● संसर्ग आटोक्यात आल्याचा दिलासा
● एकूण सक्रीय रुग्ण 1,139

Advertisements

सातारा / प्रतिनिधी :

जिल्ह्यात सलग नवव्या दिवशीही बाधित वाढीचा आलेख शंभरच्या खाली राहिला असून, गेल्या दोन-तीन दिवसात बाधित वाढ 50 ते 100 च्या दरम्यान स्थिर आहे. सध्या बाधित वाढीचा मंदावलेला वेग, घटलेला मृत्यूदर आणि वेगाने सुरू असलेले लसीकरण यामुळे पॉझिटिव्हिटी दराचा आलेख वाढलेला नाही, पण तो स्थिर आहे. जिल्ह्यात जगरहाटीला गती आली असून आगामी दीपावली सणाची तयारी सुरू झाली आहे. या एकूण वातावरणात कोरोनाचा कहर कमी झाला असला तरी काळजी घेण्याचा संदेश परिस्थिती देत आहे.

सोमवारी रात्री अहवालात 74 बाधित

प्रशासनाकडून मंगळवारी सकाळी देण्यात आलेल्या सोमवारी रात्रीच्या अहवालातील माहितीनुसार 74 जणांचा अहवाल बाधित आलेला असून एकूण 3 हजार 65 जणांची तपासणी करण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली आहे. पॉझिटिव्हिटी दराचा आलेख वही खाली घसरला असून तपासण्यांचा वेगही जिल्ह्यात कमी झाला आहे.

कोरोनाचा ‘हत्ती गेला शेपूट राहिलंय’

ऑक्टोबर महिन्याच्या मध्यावर जिल्हय़ातील कोरोना संसर्गाचा आलेख मोठय़ा प्रमाणावर खाली घसरला आहे. एकीकडे वेगाने सुरु असलेले लसीकरण व दुसरीकडे मंदावत असलेली बाधित वाढ या स्थितीत रविवारी रात्रीच्या अहवालाने मोठा दिलासा दिला आहे. या अहवालातील नोंदीनुसार खंडाळा, कोरेगाव, महाबळेश्वर, पाटण व वाई तालुक्यात एकही नवीन रुग्ण समोर आला नाही. तर सहा तालुक्यात देखील अल्प वाढ आहे. गत आठ महिन्यात पहिल्यांदाच पाच तालुक्यात एकही नवीन रुग्ण आढळून आला नसल्याने जिल्हय़ाची वाटचाल कोरोनामुक्ती होण्याच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत.

सातारा, कराड, फलटणमध्ये थोडी वळवळ

जिल्ह्यातील एकूण कोरोना संसर्ग स्थितीमध्ये सर्व जिल्हावासीयांना भितीदायक वातावरण अनुभवले पण त्यामध्ये हॉटस्पॉट ठरलेला सातारा, कराड, फलटणसह खटाव-माण तालुक्यात देखील प्रचंड भीतीचे वातावरण होते. आता ऑक्टोबर महिन्याच्या मध्यास ही स्थिती दूर झालेले आहे. माण तालुक्यात देखील एक ही नवीन रुग्ण समोर आला नसल्याची स्थिती निर्माण झाली असून महाबळेश्वर तालुका कोरोना मुक्त झालेला आहे. सध्या अल्प वाढ सुरू असली तरी त्यामध्ये देखील दोन अंकी अल्प संख्येच्या वाढीने सातारा, फलटण, कराडमध्ये कोरोना थोडीशी वळवळ करतच आहे.

19 लाख नागरिकांनी घेतला पहिला डोस

जिल्हय़ात लसीकरणाचा वेग वाढत असून यामुळे जिल्हय़ात लस घेणाऱ्या नागरिकांची एकूण संख्या 27 लाख 22 हजार 673 एवढी दिलासादायक झालेली असून, यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 19 लाख 13 हजार 128 एवढी असून दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 8 लाख 9 हजार 545 एवढी झालेली आहे.

सोमवारी जिल्हय़ात
एकूण नमुने 21,87,032
एकूण बाधित 2,50,505
कोरोनामुक्त 2,42,289
मृत्यू 6,388
सक्रीय रुग्ण 1,139

सोमवारी जिल्हय़ात
बाधित 52
मुक्त 34
मृत्यू 03 (उशिरा नोंद केलेले)

Related Stories

कोणी घर देतं का घर?

datta jadhav

साताऱ्यातील पोलीस चौकी मोजतेय अखेरची घटका

datta jadhav

कोयना पाणलोटमधील पाऊस गायब

Patil_p

बंडातात्या कराडकर करवडीत स्थानबद्ध

Patil_p

साताऱयात अथक प्रयत्नानंतर मांजामध्ये अडकलेल्या घारीला जीवनदान

Patil_p

खा. उदयनराजेंचे जावलीत ढिश्यूम.. ढिश्यूम..

datta jadhav
error: Content is protected !!