तरुण भारत

महागावात जुगार अड्ड्यावर छापा, 13 जणांवर कारवाई

प्रतिनिधी/गडहिंग्लज

महागाव येथील मधू शिवराम गुरव यांच्या घरात सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून गडहिंग्लज पोलिसांनी 12 जणांसह घरमालक मिळून एकूण 13 जणांवर कारवाई केली आहे. कॉन्टेबल संदीप धनुकटे यांनी याबाबतची फिर्याद पोलिसात नोंदविली आहे.

Advertisements

महागावातील मधू गुरव यांच्या घरात पत्याचा जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. यातमध्ये सुरेश गोविंद कोणकेरी, फिरोज मुस्ताक नाईकवाडे, शरद तानाजी बुगडे, नियाज मुन्नीर मुल्ला, विनायक जानबा आर्दाळकर, अरूण आप्पा चौगुले, आनंदा लक्ष्मण पाटील, आनंदा कृष्णा जाधव, गंगाधर काडय्या स्वामी, नाना आप्पा जाधव (सर्व रा. महागाव), प्रकाश शिवराम पाटील (रा. वैरागवाडी), विष्णू सिध्दू रेडेकर (रा. सुळे) या 12 जणांना पोलिसांनी अटक केली. याशिवाय घरमालक मधू शिवराम गुरव (रा. महागाव) यांच्यावरही कारवाई झाली. दुचाकी, मोबाईल, जुगाराचे साहित्य व रोख रक्कम मिळून एकूण 1 लाख 91 हजार 960 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याचा अधिक तपास हवालदार संभाजी शिंदे हे करत आहेत.

Related Stories

वाडीरत्नागिरी येथे नवविवाहतेची आत्महत्या

Abhijeet Shinde

गुटखा जोमात गाव कोमात

Abhijeet Shinde

कोरोनाच्या दुसऱ्या लढ्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज

Abhijeet Shinde

कोल्हापूर : नेसरी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

Abhijeet Shinde

खर्चाचा हिशोब सादर न केलेल्या ७५ उमेदवारांना निवडणूक लढवण्यास प्रतिबंद

Abhijeet Shinde

उचतमधील दोन बाधितांच्या संपर्कात 420 जण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!