तरुण भारत

‘मल्टीपल कंडेन्सर’चे पेटंट दुशेरेच्या युवकाला

गोडोली / प्रतिनिधी :

रोज नवनवीन संशोधनाने वैद्यकीय क्षेत्रात घडामोडी घडत असतात. सातत्याने प्रयत्न आणि कठोर परिश्रमाने ध्यास घेतला की नवा शोध लागत असतो. दुशेरे येथील रणजित शशिकांत जाधव या विद्यार्थ्यांने एम.फार्म पदवी घेतलेल्या कासेगाव येथील राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्रा.सचिन लोकापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली मल्टी कंडेन्सर तयार करण्यासाठी दोन वर्षे संशोधन केले. आतापर्यंत फार्मसी क्षेत्रात औषधे निर्मितीची प्रक्रिया, अभ्यास करताना एकाच वेळी एकच कंडेन्सर वापरावा लागत होता. त्यामुळे वेळ आणि जादा खर्च सोसावा लागायचा. यात नवनवीन तंत्रज्ञानाची जोड देत मल्टी कंडेन्सर तयार झाला तर एकाच वेळी अनेकांना तो वापर करून अभ्यास, प्रयोग आणि प्रक्रिया करता येऊ शकेल, असा कयास रणजित जाधव याने लावत संशोधनाला सुरुवात केली.या प्रा.लोकापूरे यांच्या मार्गदर्शनाने यात अवघ्या दोन वर्षात त्याला त्यात परफेक्ट यश आले.

Advertisements

राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत मगदूम आणि उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास मोहिते हे दोघेही सतत नवनवीन संशोधन करत असतात. त्या दोघांनी मल्टी कंडेन्सरच्या काही चाचण्या घेतल्या. त्यांनी काही तज्ञांना हि त्याच्या अनेक चाचण्या घेण्यास सांगितले. त्या संशोधनाला यश आल्याची खात्री झाल्यावर प्रा.सचिन लोकापूरे आणि रणजित जाधव यांनी फार्मसी क्षेत्राला नवी दिशा दिल्याचे विश्वास व्यक्त केला.

‘मल्टी कंडेन्सर’ याबाबत जागतिक स्तरावर आणि शासकीय विभागात अधिक माहिती घेतली असता असे संशोधन प्रथमच झाले असल्याचे स्पष्ट झाले.त्यानंतर इंडियन पेटंट कार्यालयात याबाबत माहिती सादर केली.या कार्यालयाच्या पेटंट वेबसाईटवर ती माहिती प्रसिद्ध झाली.त्यानंतर काही कालावधीत पेटंट कार्यालयाने या संशोधना स्विकार करत प्रमाणपत्र दिले.

या पेटंटचे पुढील २० वर्षापर्यंत रणजित जाधव यांच्याकडे हक्क राहणार असून त्यात अधिक सुलभता आणण्यासाठी पुढे प्रयत्न करणार असल्याचे त्याने सांगितले.देशात अशा प्रकारचा फार्मसी क्षेत्रातील अत्यंत उपयुक्त ठरणारा मल्टी कंडेन्सर तयार करणारा रणजित जाधव हा पहिला संशोधक ठरला आहे.

Related Stories

साताऱ्यात भयंकर विषारी गॅस गळतीने दाणादाण

Abhijeet Shinde

सातारा पालिका पडतेय स्वच्छ सर्व्हेक्षणात मागे

Patil_p

सातारा जिल्ह्यात ३३७ कोरोना बाधित ; तर ११ मृत्यू

Abhijeet Shinde

अनाथ बालकांसाठी मदत कक्षाची स्थापना

datta jadhav

सातारा : आजपासून दारूच्या दुकानांना परवानगी ; नागरिकांमधून तीव्र नाराजी

Abhijeet Shinde

सातारा : कृषि विज्ञान केंद्र, बोरगांव येथे पोषण अभियान परिसंवाद

Abhijeet Shinde
error: Content is protected !!