तरुण भारत

उत्तर कोरियाकडून पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी

ऑनलाईन टीम / प्योंगयांग :

क्षेपणास्त्र चाचणी न करण्याचे आवाहन अमेरिकेने केले असनाही अण्वस्त्र आणि शस्त्रसज्जता वाढवण्याच्या प्रयत्नात उत्तर कोरियाने आज पुन्हा समुद्रात क्षेपणास्त्र चाचणी केली. दक्षिण कोरिया आणि जपानच्या लष्कराने याबाबतची माहिती दिली.

Advertisements

उत्तर कोरियाने समुद्रात बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागल्याने जपानच्या तटरक्षक दलाने जहाजांना तातडीने सागरी सुरक्षेचा संदेश जारी केला आहे. उत्तर कोरियाने चाचणी केलेले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचे होते. किती अंतरापर्यंत हल्ला करण्यास सक्षम असू शकते, याबाबतची माहिती अद्याप समोर आली नाही.

उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांकडून सप्टेंबर महिन्यात क्षेपणास्त्र चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर आज उत्तर कोरियाने पुन्हा अचानकपणे क्षेपणास्त्र डागल्याने कोरियन भागात तणाव वाढला आहे. दरम्यान, यापूर्वी उत्तर कोरियाने म्हटले होते की, आम्ही युद्ध करण्यासाठी नव्हे तर आत्मसंरक्षणासाठी शस्त्र विकसित करत आहे.

Related Stories

पाकिस्तानमध्ये पावसाचे थैमान; 58 जणांचा मृत्यू

datta jadhav

5 सप्टेंबरपूर्वी सर्व शिक्षकांचे लसीकरण करा : मनसुख मांडविया यांची राज्यांना सूचना

Rohan_P

प्रक्षोभक भाषण प्रकरणी अकबरुद्दीन ओवैसी, बांदी यांच्यावर गुन्हा

datta jadhav

शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज; प्रकृती उत्तम

Abhijeet Shinde

आता NDA परीक्षा मुलींनाही देता येणार ; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Abhijeet Shinde

उत्तर प्रदेशात कोरोनाचा पहिला बळी

prashant_c
error: Content is protected !!