तरुण भारत

पती-पत्नीच्या भांडणातून स्वत:चे घर जाळताना 10 घरे आगीच्या भक्ष्यस्थानी

ऑनलाईन टीम / सातारा :

माजगाव ता. पाटण येथे पती-पत्नीच्या भांडणातून पतीने स्वत:चे घर पेटविताना आगीची ठिणगी पडल्याने आजुबाजूची इतर नऊ घरेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, 59 लाख रुपयांहून अधिक आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.

Advertisements

माजगाव येथील संजय रामचंद्र पाटील आणि त्यांची पत्नी पालवी यांच्यात घरगुती कारणावरुन सोमवारी दिवसभर भांडण सुरू होते. हे भांडण एवढे विकोपाला गेले होते की, रागातून संजय पाटील याने घराला आग लावली. घरातील गॅस सिलेंडरने पेट घेतल्याने आगीने उग्र रुप धारण केले. आगीची ठिणगी शेजारील घरांवर पडल्याने इतर 9 घरांनीही पेट घेतला. दरम्यान, ग्रामस्थांनी जयवंत शुगर आणि सह्याद्री शुगरच्या अग्निशमन दलाच्या टीमला पाचारण केले. अग्निशमनच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोन तासांत आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, या आगीत दहा घरांमधील संसारोपयोगी साहित्य, धान्य, दागिने, रोख रक्कम, शेतीची अवजारे जळून खाक झाली. जवळपास 59 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.

Related Stories

मालीमध्ये सैनिकांचे सरकारविरोधी बंड; पंतप्रधानांसह राष्ट्रपतींना घेतले ताब्यात

datta jadhav

”शरद पवारांना चुकीची माहिती देण्यात आली”

Abhijeet Shinde

गुटखा खाऊन सरकारमध्ये बसलेल्या मराठा मंत्र्यांनी समाजासाठी बोलावे – नरेंद्र पाटील

Abhijeet Shinde

साताऱ्यात वृद्ध महिलेचा खून

datta jadhav

सातारा : शोरूम मधील दुचाकी चोरी प्रकरणी एकास अटक

Abhijeet Shinde

‘या’ मागणीसाठी मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन सुरु

Rohan_P
error: Content is protected !!