तरुण भारत

फलटणमध्ये गुटखाविरोधी कारवाईत अकरा जणांवर गुन्हा

प्रतिनिधी / फलटण :

फलटण ग्रामीण पोलिसांनी केलेल्या गुटखा विरोधी कारवाईत तंबाखूजन्य माल व गुटखा जप्त करत 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी ग्रामीण पोलीस कर्मचारी यांना ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही गावात तंबाखूजन्य माल व गुटका विक्री होत असलेल्या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश देऊन 11 ठिकाणी छापे टाकत कारवाई केली. त्यामध्ये साखरवाडी येथे पोपट तुकाराम ठोंबरे, संजय यशवंत देवकर व महेश दत्तात्रय रोकडे या तिघांवर, निंभोरे येथे मुकुंदा विष्णू कांबळे, मिरगाव येथे हनुमंत किराणा दुकानात दादासो ज्ञानदेव खताळ यांच्यावर तर आसू येथे फिरोज मजीर महाल, मनोहर दत्तात्रय पवार व विजय ज्ञानदेव निंबाळकर, ढवळेवाडीत शैलेंद्र एकनाथ नलवडे आणि दिनेश बुवा माने तसेच सस्तेवाडी येथे रघुनाथ मार्तंड पायगुडे यांच्याकडे तंबाखूजन्य माल व गुटखा आढळून आल्याने त्यांच्यावर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धान्यकुमार गोडसे यांनी दिली.

Related Stories

सातारा : वडूथ येथे कोविड सेंटर उभारणार – आ.शशिकांत शिंदे

Abhijeet Shinde

लॉटरीच्या आमिषाने महिलेला सतरा लाखांचा गंडा

Patil_p

महामार्गावर विविध अपघातात दोन ठार

Patil_p

पाणलोटक्षेत्रात उघडीप, जिल्हय़ात संततधार

Patil_p

सातारा : शाहूनगरातील रस्ते दुरुस्तीची मागणी

datta jadhav

पाचगणी बाजारपेठेत श्वानाचा वावर वाढला

Patil_p
error: Content is protected !!