तरुण भारत

उत्तर कोरियाने डागले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र

वृत्तसंस्था/ प्योंगयांग

उत्तर कोरियाने मंगळवारी स्वतःच्या पूर्व किनाऱयावरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले आहे. दक्षिण कोरियाच्या सैन्याने ही माहिती दिली आहे. जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफनुसार क्षेपणास्त्राला दक्षिण हामग्योंग प्रांताच्या सिनपोनजीकच्या क्षेत्रातून डागण्यात आले होते. भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे सुमारे 03.45 वाजता हे क्षेपणास्त्र डागण्यात आले होते.

Advertisements

दक्षिण कोरिया आणि अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणा यासंबंधी अधिक माहिती मिळावी म्हणून याचे विश्लेषण करत आहेत. दक्षिण कोरिया, अमेरिका आणि जपानचे आघाडीचे आण्विक तज्ञ उत्तर कोरियासोबतची चर्चा पुन्हा सुरू करण्याच्या संयुक्त प्रयत्नांच्या अंतर्गत वॉशिंग्टमध्ये एकत्र आले असताना हे क्षेपणास्त्र डागण्यात आले आहे. उत्तर कोरियाला मानवीय मदत असेच अन्य प्रोत्साहनांद्वारे चर्चेसाठी तयार करण्याची इच्छा तिन्ही देशांची आहे.

विनाअट चर्चेची तयारी

चालू आठवडय़ात चर्चेसाठी दक्षिण कोरियाची राजधानी सोल येथे जाणार आहे. अमेरिका उत्तर कोरियासोबत पुन्हा चर्चा सुरू करू इच्छितो. आम्ही कुठल्याही अटीशिवाय त्यांना भेटण्यास तयार आहोत असे अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी सुंग किम यांनी म्हटले आहे.

सैन्यक्षमतेत वाढ

उत्तर कोरिया स्वतःच्या सैन्यक्षमतेत वेगाने वाढ करत आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियाने अनेक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या केल्या आहेत. यात एक नव्या प्रकारचे दीर्घ पल्ल्याचे क्रूज क्षेपणास्त्र आणि हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी सामील आहे.

 प्रचारमोहिमेवर परिणाम

उत्तर कोरियाच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीमुळे जपानमधील प्रचारमोहिमेवर प्रभाव पडला आहे. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी उत्तर कोरियाकडून करण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांच्या चाचणीला दुर्दैवी ठरविले आहे. क्षेपणास्त्राच्या चाचणीनंतर किशिदा यांनी उत्तर जपातमधील स्वतःची प्रचारमोहीम थांबविली आहे. तर जपानच्या तटरक्षक दलाने जहाजांसाठी मरीन सेफ्टी अलर्ट दिला आहे.

Related Stories

बायडन यांनी शब्द पाळला; पदभार स्वीकारल्यानंतर घेतले ‘हे’ निर्णय

Rohan_P

एर्दोगान यांच्यानंतर इम्रान यांची मॅक्रॉन यांना धमकी

Patil_p

मनाबे, हॅसलमन, पॅरिसी यांना भौतिक शास्त्राचे नोबेल

Patil_p

मेक्सिकोत कोरोनाने घेतले 1.80 लाख बळी

datta jadhav

भारताच्या मदतीसाठी सरसावल्या अमेरिकेतील 40 कंपन्या

datta jadhav

रशियात 10 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav
error: Content is protected !!