तरुण भारत

भारत, अमेरिका, इस्रायल अन् युएईची बैठक

आशियात आर्थिक, राजनयिक सहकार्यावर चर्चा

वृत्तसंस्था/ जेरूसलेम

Advertisements

विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी व्यापार आणि सागरी सुरक्षा वाढविण्यासह मध्यपूर्व आणि आशियात आर्थिक तसेच राजनयिक सहकार्याचा विस्तार करण्याच्या पद्धतींवर अमेरिका, इस्रायल आणि युएईच्या (संयुक्त अरब अमिरात) विदेशमंत्र्यांसोबत पहिली चतुष्कोनीय बैठक घेतली आहे. विदेशमंत्री जयशंकर सध्या इस्रायलच्या 5 दिवसीय दौऱयावर आहेत. विदेशमंत्र्यांच्या या ऑनलाईन बैठकीदरम्यान इस्रायलचे विदेशमंत्री यायर लापिड, अमेरिकेचे विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन, युएईचे विदेशमंत्री शेख अब्दुल्ला बिन जायद अल नाहयान यांनी क्षेत्रातील संयुक्त मुद्दय़ांवर विचारांचे आदान-प्रदान केले.

आर्थिक विकास आणि जागतिक मुद्दय़ांवर एकत्र मिळून काम करण्याबद्दल या बैठकीत चर्चा झाल्याचे जयशंकर यांनी ट्विट करत सांगितले आहे. तसेच त्यांनी ब्लिंकेन यांच्या विचाराशी सहमती दर्शवत अशाप्रकारचे व्यासपीठ तीन विविध द्विपक्षीय बैठकांच्या तुलनेत अधिक उत्तमप्रकारे काम करू शकत असल्याचे म्हटले आहे.

ब्लिंकेन आणि अन्य तीन देशांच्या विदेशमंत्र्यांनी मध्यपूर्व आणि आशियातील आर्थिक तसेच राजनयिक सहकार्याच्या विस्तारावर चर्चा केली आहे. यात व्यापार, हवामान बदलविरोधी लढा, ऊर्जा सहकार्य आणि सागरी सुरक्षेचा मुद्दा सामील होता. विदेशमंत्र्यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जागतिक सार्वजनिक आरोग्याच्या मुद्दय़ावर चर्चा केल्याची माहिती अमेरिकेच्या विदेश विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी दिली आहे.

ज्या गोष्टींचा आम्ही शोध घेत आहोत, त्यात ताळमेळसुद्धा सामील आहे. या बैठकीनंतर आम्ही ताळमेळ राखण्याचा प्रयत्न करणार आहोत असे इस्रायलचे विदेशमंत्री यायर लापिड म्हणाले. सहकार्याला चालना देण्यासाठी अशाप्रकारचे व्यासपीठ निर्माण केल्याप्रकरणी युएईचे विदेशमंत्री अल नाहयान यांनी ब्लिंकेन आणि लॅपिड यांचे आभार मानले आहेत. विदेशमंत्री जयशंकर हे जुने मित्र आहेत. भारत आणि युएई यांच्यात अत्यंत मजबूत आणि वैविध्यपूर्ण संबंध असल्याचे नाहयान यांनी म्हटले आहे.

Related Stories

कोरोनावर प्रभावी उपचार : ऍस्पिरिन

Patil_p

कुलभूषण जाधवांवरील सुनावणीसाठी पाकमध्ये वरिष्ठ पिठाची स्थापना

datta jadhav

अमेरिकेच्या दोन लसी प्रगतीपथावर

Patil_p

जागतिक खाद्य कार्यक्रमासाठी अभिनेता डॅनियल ब्रुल सदिच्छा दूत

Patil_p

डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराला कोरोनाची लागण

datta jadhav

भूकंपाने हादरले अफगाणिस्तान!

Rohan_P
error: Content is protected !!