तरुण भारत

काश्मीप्रकरणी अजरबैजानचे विखारी फुत्कार

पाकिस्तानला दर्शविला उघड पाठिंबा

वृत्तसंस्था/ बाकू

Advertisements

तुर्कस्तानचे ड्रोन आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या मदतीने नागोर्नो-काराबाखमध्ये आर्मेनियाला पराभूत करणाऱया अजरबैजानने आता जम्मू-काश्मीप्रकरणी गरळ ओकली आहे. आमचा देश काश्मीर मुद्दय़ावर संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रस्तावांनुसार पाकिस्तानला उघड पाठिंबा दर्शवितो असे अजरबैजानचे प्रतिनिधी खाजर फरहादोव्ह यांनी म्हटले आहे. अजरबैजानने हे विधान करून पाकिस्तानच्या ‘कर्जाची परतफेड’ करण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जातेय.

अजरबैजानच्या स्वातंत्र्याला 30 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना खाजर यांनी हे विधान केले आहे. या कार्यक्रमाच्या केकवर पाकिस्तान आणि अजरबैजानचा झेंडा तयार करण्यात आला होता.

पाकिस्तानने अजरबैजानच्या सार्वभौमत्वाशी संबंधित मुद्दय़ावर उघड समर्थन केले आहे. अजरबैजानला मान्यता देणारा पाकिस्तान हा पहिला देश होता. पाकिसतान आणि अजरबैजान हे काश्मीर आणि काराबाख सारख्या मुद्दय़ांना सामोरे जात आहेत असे उद्गार पाक संसदेतील कनिष्ठ सभागृहाचे अध्यक्ष असर कैसर यांनी काढले आहेत.

नागोर्नो-काराबामध्ये युद्धादरम्यान पाकिस्तान तसेच तुर्कस्तानने आर्मेनियाशी युद्ध लढण्यासाठी हजारो दहशतवादी पाठविले होते. हे दहशतवादी गृहयुद्धाने होरपळलेल्या सीरिया आणि लीबियातून पाठविण्यात आले होते. ‘किलिं मशीन’ म्हटले जाणाऱया या दहशतवाद्यांना मुस्लीम देश अजरबैजानच्या बाजूने ख्रिश्चनबहुल देश आर्मेनियाच्या विरोधातील युद्धात लढण्यासाठी प्रचंड पैसा पुरविण्यात आला होता. हे सर्व दहशतवादी अल हमजा ब्रिगेडचे होते. तुर्कस्तान आणि पाकिस्तानने हा आरोप फेटाळला होता. पाकिस्तानचे अनेक दहशतवादी या भागात अत्यंत सक्रीय होते.

Related Stories

अमेरिकेच्या सैनिकांवर हल्ल्याचा चीनचा कट

Patil_p

चीनमधून कोरोना महामारीची सुरुवात : डब्ल्यूएचओ

Patil_p

इस्त्रायलची जर्मनीकडून पाणबुडय़ांची खरेदी

Patil_p

दुबईत महात्मा गांधींना अनोखी आदरांजली

datta jadhav

चीनी टेनिस स्टार पेंग शुईचा लैंगिक अत्याचाराचा दावा

Abhijeet Shinde

बेल्जियम : 25 जणांना अटक

Omkar B
error: Content is protected !!