तरुण भारत

भारतीय पाणबुडीवर घुसखोरीचा पाकचा आरोप

रोखल्याचा केला दावा

वृत्तसंस्था / कराची

Advertisements

पाकिस्तानी जलक्षेत्रात घुसखोरीचा प्रयत्न करणाऱया एका पाणबुडीची ओळख पटवून तिचा मार्ग रोखण्यात आल्याचा दावा पाकिस्तानी नौदलाने केला आहे. पाकिस्तानी नौदलाने एक चित्रफित प्रसारित करत अरबी समुद्रात ही घटना 16 ऑक्टोबर रोजी घडल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानी नौदलाच्या टेहळणी विमानाने भारतीय पाणबुडीचा थांगपत्ता लावण्याची ही तिसरी घटना असल्याचेही सांगण्यात आले.

 तर भारतीय सूत्रांकडून पाकिस्तानचा दावा फेटाळण्यात आला. हा पाकिस्तानचा दुष्प्रचार आहे. कुठलाच देश अन्य देशाच्या जलक्षेत्रात पाणबुडी पाठवत असल्यास ती सागराच्या पृष्ठभागावर आणणार नसल्याचे सांगण्यात आले. पाकिस्तानी नौदलाने प्रसारित केलेल्या चित्रफितीत एक पाणबुडी दिसून येतेय. भारतीय नौदलाकडून याप्रकरणी कुठलीच प्रतिक्रिया प्राप्त झालेली नाही.

मार्च 2019 मध्येही भारताच्या एका पाणबुडीला अरबी समुद्रात डिटेक्ट करण्यात आल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. ही पाणबुडी सहजपणे नष्ट करता येणार होती. पण शांततेला एक संधी देण्याकरता ही कारवाई केली नसल्याचेही पाकिस्तानकडून म्हटले गेले आहे.

भारताला घायाळ करण्याचे स्वप्न पाहणाऱया पाकिस्तानच्या नौदलाची अवस्था मात्र वाईट आहे. तांत्रिक अडचणी आणि मिडलाइन रीफीटमुळे आता त्याच्या केवळ दोन पाणबुडय़ाच सक्रीय आहेत. पाकिस्तानच्या 5 पैकी 3 अगोस्ता शेणीतील पाणबुडय़ांना अपग्रेड करण्यात येतेय किंवा त्यात तांत्रिक समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे या पाणबुडय़ा सध्या समुद्रात उतरू शकत नाहीत. पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत पाकिस्तानला केवळ दोन पाणबुडय़ांवरच विसंबून रहावे लागणार आहे.

Related Stories

भारताचा रशियाबरोबर नौदल सराव

Patil_p

चीनचे ‘सुखोई-35’ विमान तैवानकडून टार्गेट

Patil_p

ऑस्ट्रेलियात महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड

datta jadhav

नेपाळमध्ये कोरोनाचा कहर, ओलींचे दुर्लक्ष

Patil_p

पाकिस्तानातच शिजला 26/11 हल्ल्याचा कट

Omkar B

न्यूझीलंडमधील भारतीय वंशाच्या महिला मंत्र्यांनी केले मल्याळममध्ये भाषण

datta jadhav
error: Content is protected !!