तरुण भारत

बांगलादेशात आतापर्यंत 70 मंदिरांमध्ये तोडफोड

6 जणांचा मृत्यू – हिंदूधर्मीय लक्ष्य

वृत्तसंस्था/ ढाका

Advertisements

बांगलादेशमध्ये सांप्रदायिक हिंसाचारात मृत्युमुखी पडणाऱयांची संख्या वाढून 6 झाली आहे. तर देशभरात किमान 70 हिंदू मंदिरांमध्ये तोडफोड करण्यात आली आहे. बांगलादेश हिंदू-बौद्ध-ख्रिश्चन इक्य परिषदेचे महासचिव राणा दासगुप्ता यांनी ही माहिती दिली आहे. कमिला जिल्हय़ात 13 ऑक्टोबर रोजी अत्याचारांचे सुरू झालेले सत्र वेगाने चांदपूर, नोआखली, किशोरगंज, चितगाव, फेनी आणि रंगपूर समवेत देशाच्या अन्य भागांमध्ये फैलावले आहे. राष्ट्रपती अब्दुल हमीद यांच्याकडून जारी एका तत्काळ आदेशावर आतापर्यंत रंगपूर आणि फेनी येथील 7 पोलीस अधिकाऱयांना हटविण्यात आले आहे.

रंगपूरच्या बोरो करीमपूर या गावातील हिंसाचारात 6 हिंदू कुटुंबांची घरे पेटवून देण्यात आली आहेत. या कुटुंबांवर विस्थापित होण्याची वेळ आली आहे. गुन्हेगारांनी दोन दुकाने आणि मंदिरांमध्येही तोडफाड करत मौल्यवान सामग्री लुटली आहे.

तर ढाका येथील शाहबाग चौकात या हिंसाचाराच्या विरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. ढाका विद्यापीठाचा विद्यार्थी जॉयदीप दत्ता यांनी 7 सूत्री मागण्या ठेवल्या आहेत. हल्लेखोरांना कठोर शिक्षा, मंदिरांचा जीर्णोद्धार, अल्पसंख्याकांसाठी एक स्वतंत्र मंत्रालय किंवा आयोगाची स्थापना, हिंदूंना भरपाई यांचा यात समावेश आहे. तसेच अन्य शहरांमध्येही हिंदू समुदायाने हिंसाचाराच्या विरोधात निदर्शने केली आहेत.

Related Stories

जर्मनीत नवे रूग्ण

Patil_p

अलास्कात त्सुनामीचा इशारा

datta jadhav

चीनने दक्षिण चीन समुद्रात डागली दोन ‘किलर’ क्षेपणास्त्रे

datta jadhav

सौदी अरेबियाने पाकिस्तानला झिडकारले

Patil_p

प्रतिक्षा संपली : रशियाची ‘स्पुतनिक-व्ही’ लस 1 मे ला भारतात

datta jadhav

शून्य कार्बन उत्सर्जनाचे जपानचे उद्दिष्ट

datta jadhav
error: Content is protected !!