तरुण भारत

रश्मिका मंदाना टॉप इन्स्टाग्राम सेलेब्रिटी

दिग्गज कलाकारांना टाकले मागे

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदानाने आता फोर्ब्सच्या यादीतही स्वतःचा ठसा उमटविला आहे. या यादीनुसार रश्मिका दक्षिणेतील सर्वात लोकप्रिय कलाकार ठरली आहे. तिने दक्षिणेतील आणखी एक अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू हिला मागे टाकले आहे. फोर्ब्सने इन्स्टाग्रामवर दक्षिणेतील 30 सर्वात प्रभावशाली सेलेब्रिटीजची यादी प्रसिद्ध केली आहे.

Advertisements

ही यादी तयार करण्यासाठी सेलेब्रिटीजच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर सरासरी लाइक्स, कॉमेंट्स, इंगेजमेंट रेट, सरासरी व्हिडिओ ह्यूज आणि फॉलोअर्सची संख्या  हे घटक विचारात घेण्यात आले आहेत. प्रत्येक सेलेब्रिटीला गुण देण्यात आले आहेत. यात रश्मिकाने 10 पैकी 9.88 गुण प्राप्त करत पहिले स्थान मिळाले. अर्जुन रेड्डी फेम अभिनेता विजय देवरकोंडा 9.67 टक्के गुणांसह दुसऱया स्थानावर राहिला. तर केजीएफ फेम अभिनेता यशला 9.54 अंक मिळाले आहेत. अभिनेत्री सामंथा रुथ प्रबू 9.49 अंकांसह चौथ्या स्थानावर राहिली. तर पाचव्या स्थानावर 9.46 अंकांसह अल्लू अर्जुन राहिला आहे. फोर्ब्सने ही यादी तेलगू, तमिळ, मल्याळी आणि कन्नड चित्रपटसृष्टीतील कलाकारांना मिळून तयार केली आहे.

17 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱया पुष्पा या तेलगू चित्रपटातून रश्मिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रश्मिका लवकरच गुडबाय आणि मिशन मजनूं या  हिंदी चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे.

Related Stories

अंकुश चौधरी- प्राजक्ता माळीच्या लकडाऊनचा मुहुर्त संपन्न

Patil_p

डीकपल्ड सीरिजमधून झळकणार माधवन

Amit Kulkarni

‘सोनी सब’ वर पुन्हा एकदा ऑफिस ऑफिस

Omkar B

…म्हणून रियाच्या जामीन अर्जावरील आजची सुनावणी रद्द

Rohan_P

’गाव आलं गोत्यात 15 लाख खात्यात’ची घोषणा

Patil_p

‘मिस यु मिस’ अश्विनी एकबोटेंना समर्पित

Patil_p
error: Content is protected !!