तरुण भारत

तुमचे ग्रह आमचा अंदाज

बुध. दि.20 ते मंगळ दि. 26 ऑक्टोबर 2021

परमेश्वराचे खरे स्वरूप ओळखणे ही खरी श्रद्धा

Advertisements

मनुष्य प्राण्याच्या जीवनात चांगले काही घडू लागले की ते सर्व माझ्या प्रयत्नाने झाले त्यात देवाचा काय संबंध असे काही जण म्हणू लागतात व देवाला विसरतात. तर काही वेळा अचानक एखादी दुर्घटना घडल्यानंतर मी इतकी पूजा-अर्चा, जपजाप्य, शांती वगैरे धार्मिक कार्य करूनसुद्धा असे कसे घडले? त्यामुळे यापुढे मी देव मानणार नाही. देवाचे सर्व काही सोडून दिलेले आहे असे नैराश्यपूर्ण उद्गारही काहीजण काढतात. देव म्हणजे काही बाजारातली वस्तू नाही. दहा रु.चे पेढे किंवा नारळ ठेवून लाख रुपये मागणारे लोक आहेत. तुमचे एखादे मोठे काम झाले नाही अथवा एखादी वाईट घटना घडली तर त्यात देवाचा काहीही संबंध नसतो. या जन्मात किंवा मागील जन्मात आपल्या हातून जी काही बरेवाईट कर्मे होत असतात त्याचेच ते परिणाम असतात. देवाने प्रत्येकाला बरेच काही दिलेले आहे पण त्याचा वापर कसा करायचा त्यातून काय घ्यावे हे मात्र अनेकांना समजत नाही. आपले चलन वलन. शरीरातील प्राण हवा पाणी आकाश सूर्यापासून मिळणारी ऊर्जा, नद्या डोंगर समुद्र, ज्वालामुखी भूकंप तसेच स्वच्छ हवा आल्हाददायक वातावरण, प्राणवायू, उपजीविकेसाठी आवश्यक असणारे कर्म व त्यासाठी दिलेली बुद्धी यांचा उगम शोधण्याचा कोणी प्रयत्न केला आहे का? कोळय़ाचे जाळे विणण्याची कला, पक्ष्यांचे घरटे बांधण्याचे कसब, तसेच मधमाशांना मध गोळा करण्याची दिलेली कला. या साऱया गोष्टींचा निर्माता कोण याचा जरा विचार करा म्हणजे परमेश्वर म्हणजे काय चीज आहे हे सहज समजेल. जिथे निर्मिती आहे तेथे निर्माता हा असणारच हा वैज्ञानिक सिद्धांत आहे. अंतरात्मा व  परमात्मा असे जे दोन शब्द आपण वारंवार ऐकतो त्याचा अर्थ किती लोकांना माहीत आहे? लग्न नोकरी-व्यवसाय मुलेबाळे आरोग्य आर्थिक स्थिती यासह जर कोणत्याही बाबतीत जर अपयश आले तर आपण देवाला दोष देतो व या जगात देव नाहीच असे म्हणतात पण इतकी संकटे येऊनदेखील तुम्ही आज जिवंत आहात. हवा पाणी प्राणवायू अग्नि यासह ज्या ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत त्या जर नसत्या तर कोणी जिवंत राहिलेच नसते. शेवटी कर्ता करविता तोच आहे. त्यामुळे माणसाने फार नास्तिक असू नये. आपल्या स्वभावात आणि प्रयत्नातच देव आहे. हे ज्यादिवशी माणसाला कळेल तो दिवस आयुष्यातला खरा दिवस म्हणता येईल. जगात कुणी कितीही मोठे झाले तरी निसर्ग आपल्यापेक्षा यांना कधीही मोठे होऊ देत नाही. त्यामुळे मी श्रे÷, श्रीमंत मीच, सर्वेसर्वा, माझ्याएवढे हुशार कोणीच नाही, असे कुणीही समजू नये, प्रचंड वादळी वारे, आकाशातून पडणारी वीज, मुसळधार पाऊस या गोष्टी कुणीही थांबवू शकत नाहीत. त्याची सर्व सूत्रे परमेश्वराच्या  अधीन असतात. त्याची कृपा झाली तर क्षणार्धात रंकाचा राव होईल व कोपल्यास क्षणार्धात होत्याचे नव्हते होईल हे प्रत्येकाने लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

मेष

मंगल बुध युती व शुक्र केतु युती अनेक कामात मोठे यश मिळवून देतील. नोकरी उद्योगात वातावरण चांगले राहील. भावंडांची मदत मिळेल पण जरा वैचारिक आणि व्यावहारिक मतभेद राहतील. सासू-सासरे व मातापित्यांच्या बाबतीत शुभ. घर जागा दुकान व फ्लॅट
तसेच जमिनींचे व्यवहार यशस्वी होतील सरकारी कामात उत्तम यश. 

वृषभ

सप्तमातील केतू शुक्रामुळे महत्त्वाचे प्रवास. अवघड शिक्षणात उत्तम यश मिळेल. संततीसौख्य उत्तम राहील. नव्या ऑर्डरी मिळाल्यामुळे कामाचा उत्साह चांगला राहील. स्वतःच्या कर्तबगारीने नावलौकिक मिळवाल. बोलणे जरा खानदानी   थाटाचे ठेवा त्यामुळे चांगला प्रभाव पडेल. गायनवादन यात चांगले यश तसेच आर्थिक स्थिती उत्तम राहील.

मिथुन

गुरु व शनि दोन्ही मार्गी झाल्यामुळे खोळंबलेली महत्त्वाची कामे होऊ लागतील. आर्थिक आवक चांगली राहील गायन-वादन संगीतकला
यात प्रावीण्य मिळवाल मौल्यवान वस्तूंच्या व्यापारात अथवा खरेदीत उत्तम यश. पण घसा व डोळय़ाची काळजी घ्यावी लागेल. नोकरी व्यवहार जमीन आणि वास्तु संदर्भातील अडलेले काम पूर्ण होईल.

कर्क

शुक्राचे भ्रमण, आंतरजातीय प्रेमप्रकरणे निर्माण करण्याची शक्मयता आहे. सावध रहा. मंगळ बुधामुळे व्यवहार दक्ष रहाल व त्याचा तुमच्या नोकरी व्यवसायावर चांगला प्रभाव पडेल. न होणारी अनेक कामे आपोआप होऊ लागतील. एखादी व्यक्ती जीवनाला चांगले वळण लावू शकेल. अति हळवेपणा आणि अति दानशूरपणा या गोष्टीवर जरा नियंत्रण ठेवा. अन्यथा कोणीतरी त्याचा गैरफायदा घेऊ शकतात

सिंह

शुक्र सर्व बाबतीत उत्तम आहे. कौटुंबिक सुख-समाधान चांगले, ऐषारामी जीवन, घराची रंगरंगोटी आणि दुरुस्ती यासाठी बराच खर्च कराल. आर्थिक लाभ होतील. जमीन-जुमला प्रवास यात महत्त्वाचे करार मदार होतील. मनातील अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. मंगळामुळे कागदपत्र व्यवहारात नुकसान किंवा घोटाळा होऊ शकतो सावध राहणे आवश्यक.

कन्या

एक बुद्धिमान आणि व्यवहारदक्ष तर दुसरा धाडसी आणि कर्तव्यदक्ष अशा दोन ग्रहांची युती तुमच्या राशीत होत आहे. त्यामुळे बरीच महत्त्वाची अवघड कामे हातावेगळी करू शकाल. बुधाचा जप केल्यास संकटे नाहीशी होऊ शकतील. बुध महत्त्वाच्या स्थानात आहे. वक्तृत्व स्पर्धेत यश मिळेल. साहित्याची आवड असेल तर नावलौकिक. उच्च पदाची नोकरी मिळण्याची शक्यता.

तूळ

मंगळ बुध बाराव्या स्थानी आहेत हा योग चांगला नसतो. विश्वासघात खोटी कागदपत्रे यापासून सांभाळावे शुक्राचे भ्रमण धनलाभ नवीन व्यवसायाचा प्रारंभ तसेच अचानक प्रवास घडवील. विवाहाच्या वाटाघाटीत उत्तम यश. जर पूर्वी नोकरीसाठी प्रयत्न केला असेल तर त्याचा कॉल येईल दिवाळीच्या निमित्ताने केलेल्या साफसफाईने वातावरण प्रसन्न राहील.

वृश्चिक

तुमच्या राशीतच शुक्र केतू असल्याने त्याचा व्यावहारिक फायदा मिळेल. नवनवीन फॅशन डिझायनिंग  व  कलाकुसरीच्या कामात यश मिळवाल. संकटात मदतीला धावून जाण्याच्या वृत्तीमुळे लोकप्रियता लाभेल. मोठे व्यापार आणि उद्योगात यश. लाभातील मंगळ बुधामुळे जीवनातील अनेक अवघड समस्यावर मार्ग निघेल जे काम हाती घ्याल ते उत्साहाने पूर्ण कराल

धनु

ग्रहमान सर्व बाबतीत अनुकूल आहे. चौफेर प्रगती सुरू होईल पण तरीदेखील काही बाबतीत त्रास होण्याची शक्मयता असल्याने दैवी आराधनेकडे दुर्लक्ष करू नका. दशमातील मंगळ बुधामुळे उच्च शिक्षणात मनासारखे यश मिळेल. व्यवहारात राहूनही धार्मिक व पारमार्थिक वृत्ती वाढेल. शुक्रकेतु युतीमुळे अचानक धनलाभाचे योग पण काही बाबतीत अस्थिरता व अडचणी जाणवतील.

मकर

कोणतेही काम वेळेवर होत नसल्याने कौटुंबिक जीवनात जरा चिडचिड होण्याची शक्यता आहे. कोणतेही काम मन शांत ठेवून करावे. लाभात प्रवेश केलेल्या शुक्रामुळे संसारी जीवनात महत्त्वाच्या घटना घडतील. नोकरी अथवा व्यवसायाच्या निमित्ताने काही नवीन आर्थिक करार मदार होऊ शकतील. कौटुंबिक जीवनात पती-पत्नीतील मतभेदांना थारा देऊ नका.

कुंभ

अष्टमातील बुध मंगळाचे भ्रमण एखाद्या नको त्या व्यक्तीमुळे मनस्ताप घडवेल. महत्त्वाच्या कागदपत्रावर सही करताना जपावे लागेल. आर्थिक अडचणीत सापडलेल्या एखाद्या व्यक्तीचे वाहन मिळण्याची शक्यता आहे. विवाहातील अडथळे कमी होतील. जोडीदार चांगला मिळेल पण वाटाघाटीचे वेळी कुणीतरी नको ते मुद्दे उपस्थित केल्याने काही अडचणी निर्माण होतील.

मीन

काहीवेळा पहाटे पडलेली स्वप्ने खरी होतात त्याचा अनुभव येईल. आर्थिक स्थिती सुधारेल. नवीन नोकरी व्यवसाय सुरू करण्यास अनुकूल काळ. पण व्यसन वगैरे असेल तर ते सोडावे लागेल. मानसिक व कौटुंबिक स्थिती उत्तम राहील. शुक्र केतुचे भ्रमण चैनी वृत्ती वाढवेल. तसेच जगावेगळे प्रेम प्रकरण अथवा तत्सम मार्गाकडे मन वळविल. त्यासाठी धार्मिकतेकडे विशेष लक्ष द्या.

Related Stories

आजचे भविष्य शनिवार दि. 6 मार्च 2021

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 10 नोव्हेंबर 2020

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 28 मार्च 2020

tarunbharat

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 28 सप्टेंबर 2021

Patil_p

राशिभविष्य

Patil_p
error: Content is protected !!