तरुण भारत

‘आयआरसीटीसी’च्या गुंतवणूकदारांची चांदी

कंपनीचे बाजारमूल्य 1 लाख कोटीवर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

भारतीय शेअर बाजारात इंडियन रेल्वे कॅटरिंग ऍण्ड टुरिझम कॉर्पोरेशनचा (आयआरसीटीसी) समभाग मंगळवारी सकाळी 8 टक्क्यांची नवी उंची गाठत 6,375 रुपयावर पोहोचला आहे. याचे बाजारमूल्य प्रथमच 1.01 लाख कोटी रुपये झाले आहे. बाजारमूल्यासह कंपनी सर्वात मोठी 52 वी कंपनी बनली आहे.

आयआरसीटीसीच्या समभागाने एक वर्षात जवळपास 5 पटीने गुंतवणूकदारांना अधिकचा परतावा दिला आहे. यात ज्यांनी गुंतवणूक केली होती त्यांची चांदी झाली. एक वर्षापूर्वी या समभागाचा भाव तब्बल 1291 रुपये होता. एक महिन्याअगोदर या समभागाने जवळपास दोन पट परतावा दिला आहे. एक महिन्याच्या अगोदर या समभागाचा भाव 3,550 रुपये होता. एकाच आठवडय़ात समभागाने 1,500 रुपयाचा फायदा मिळवून दिला आहे.

बाजारमूल्य वधारुन दुप्पट

आयआरसीटीसीचे बाजारमूल्य एक महिन्या अगोदर 48 हजार कोटी रुपये होते. तेव्हापासून यात वाढ होत जात दुप्पट बाजारमूल्य झाले आहे. बाजाराने यामध्ये मंगळवारी नवा विक्रम करत 62 हजारावर उडी घेतली आहे. आयआरसीटीचे समभाग आगामी काळातही चढतीचा प्रवास करणार असल्याचे संकेत शेअर बाजारातील अभ्यासक व्यक्त करत आहेत.

Related Stories

डिजिटल पेमेन्टसाठी स्मार्टफोन आवश्यक नाही?

Patil_p

चढउताराच्या प्रवासात बाजार स्थिरावला

Patil_p

फ्लिपकार्ट आता करणार नेपाळमध्ये विक्री

Patil_p

स्पाईस एक्स्प्रेसची ड्रोनने डिलिव्हरी

Amit Kulkarni

टाटाच्या या कंपनीने दिले लाखाचे 13 लाख

Patil_p

डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत

Patil_p
error: Content is protected !!