तरुण भारत

डिजिटल गोल्डमधील गुंतवणूक वाढली

गेल्या नऊ महिन्यातील आकडेवारी – सप्टेंबरमध्ये 446 कोटीची गुंतवणूक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

सोन्याच्या किमती घसरण्यासोबत सोन्यामधील गुंतवणूक वाढत गेली आहे. सप्टेंबर महिन्यात गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (गोल्ड इटीएफ) मध्ये 446 कोटी रुपयाची गुंतवणूक आली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या आकडेवारीनुसार 2021 च्या अगोदर 9 महिन्यात गोल्ड इटीएफमध्ये एकूण 3,515 कोटी रुपयाची गुंतवणूक आली आहे.

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने दिलेल्या माहितीनुसार या वर्गातील फोलियोची संख्या वधारत गेली आहे. सप्टेंबरमध्ये फोलियोची संख्या वाढून 24.6लाख कोटीवर गेली आहे, जी मागील महिन्यात 21.46 लाख होती. चालू वर्षात आतापर्यंत फोलियोची संख्या 56 टक्क्यांनी वाढली आहे.

जुलैमध्ये 61 कोटी काढले

गेल्या ऑगस्टमध्ये गोल्ड इटीएफमध्ये 24 कोटी रुपये आले  होते. या अगोदर जुलैमध्ये गोल्ड इटीएफमधून गुंतवणूकदारांनी 61 कोटी रुपयापेक्षा अधिकची रक्कम काढली.

काय आहे गोल्ड इटीएफ?

ओपन एंडेड म्युच्युअल फंड असतो, ज्यात सोन्याचे भाव वाढ-घसरणीवर आधारीत असतात. यामध्ये इटीएफ जास्तीत जास्त कॉस्ट इफेक्टिव्ह असतो. एक गोल्ड इटीएफ युनिटचा अर्थ आहे, 1 ग्रॅम सोने. यावर आधारीत सर्व व्यवहाराला गोल्ड इटीएफ म्हणतात.

Related Stories

विजेची दैनंदिन मागणी वाढली

Patil_p

‘एलजी’कडून नवा प्रोजेक्टर लाँच

Omkar B

मध्यमवर्गियांना हवी उत्पन्नात वाढ

Patil_p

बजाज ऑटोची तिमाहीत मजबूत कामगिरी

Amit Kulkarni

एअरटेलची नवी वेगवान इंटरनेट सेवा

Patil_p

‘एनसीसी’ला 8,980 कोटींचे कंत्राट

Patil_p
error: Content is protected !!