तरुण भारत

ऍपलची नवी उत्पादने दिमाखात सादर

मॅकबुक 14 सह आवाजाची उपकरणे सादर –  अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

ऍपलने सोमवारी रात्री उशिरा आपल्या ळहतेप् कार्यक्रमात मॅकबुक प्रो, थर्ड जनरेशन इअरपॉड्स, होमपॅड मिनीसह अन्य काही उत्पादने सादर केली आहेत. या कार्यक्रमात विशेष उत्पादन म्हणजे मॅकबुक प्रो राहिले आहे. यामध्ये कंपनीने आपल्या इन हाऊस एम1 मॅक्स चिपचा वापर केला आहे. यावर कंपनीने दावा केला आहे, की हे उत्पादन कोणत्याही हाय ऍण्ड पीसीच्या तुलनेत 3.3एक्सपेक्षा फास्ट राहणार असल्याचे म्हटले आहे.

कंपनीने आपल्या 14.2 इंच स्क्रीनच्या आकाराचे मॅकबुक प्रो लाँच केले आहे. यामध्ये नॉच डिस्प्लेचा वापर करण्यात आला आहे. हे ऍपलच्या नवीन एम1 प्रो आणि मॅक्स चिप सोबत येणार आहे. यामध्ये थंडरबोल्ट कनेक्टिव्हिटीसह एमडीएमआय पोर्ट आणि एसडी कार्ड रिडरही मिळणार आहे.

16.2 इंच मॅकबुक प्रो 6 स्पीकरसोबत

ऍपलचा नवा मॅकबुक 16.2 इंच प्रो सोबत सादर झाला आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत या मॉडेलला अधिकची पसंती मिळणार असल्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत.

नव्या एअरपॉड्सवर सहा तास म्युझिक

नवीन अत्याधुनिक तिसऱया जनरेशनलमधील एअरपॉड्सला सादर केले आहे. यामध्ये हार्ड प्लास्टिकचा वापर केला आहे. ज्याचा वापर केल्याने कानास कमी त्रास होणार असून असा बदल हा 2016 नंतर केला असल्याचे दिसून येत आहे.

होमपॅड मिनी तीन रंगात

ऍपलचे होमपॅड मिनी स्पीकर आता नवीन कलर्समध्ये उपलब्ध होणार असून ग्राहकांना यलो, ऑरेंज आणि ब्लू या रंगामध्ये  घेता येणार असल्याची माहिती आहे.

Related Stories

आर्थिक,आयटी-वाहन कंपन्यांमुळे बाजारात उत्साह

Omkar B

शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये घसरण कायम

Amit Kulkarni

ऍक्सिस बँकेला 1,683 कोटींचा नफा

Patil_p

स्टार्टअपमधील श्रीमंतांच्या यादीत फाल्गुनी नायर अव्वल

Amit Kulkarni

टाटा मोटर्सची ‘इंडिया की दुसरी दिवाली’ मोहिम

Omkar B

बायजूसकडून एपिकचे 50 कोटी डॉलर्समध्ये अधिग्रहण

Amit Kulkarni
error: Content is protected !!