तरुण भारत

सात दिवसांची तेजी अखेर थांबली

सेन्सेक्स-निफ्टी प्रभावीत – नफावसुलीचा परिणाम

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

मागील सलग सात दिवस तेजीचा प्रवास कायम ठेवणाऱया भारतीय शेअर बाजारात अखेर चालू आठवडय़ातील मंगळवारच्या सत्रात हा प्रवास खंडित झाला आहे. यामध्ये नफावसुलीच्या कारणास्तव गेल्या सात सत्रातील तेजीसोबत सकाळच्या सत्रात बाजाराने तब्बल 62,000चा टप्पा प्राप्त करत नवा विक्रम नोंदवला होता. परंतु बाजार बंद होताना मात्र प्रभावीत होत बंद झाला आहे.

मजबूत नफा वसुली झाल्याने दिवसअखेर सेन्सेक्स 50 अंकांनी घसरुन निर्देशांक बंद झाला आहे. मंगळवारच्या सत्रात दिवसभरात बीएसई सेन्सेक्सने काहीवेळ 62,245.43 वर पोहोचत आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडित काढले आहेत.

यासह दिवसअखेर बाजारात  49.54 अंकांनी घसरुन निर्देशांक 61,716.05 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला 58.30 अंकांनी घसरुन राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 18,418.75 वर बंद झाला आहे. दिवसभरातील प्रवासात काही वेळ निफ्टी 18,604.45 वर पोहोचत नवा विक्रम प्राप्त केल्याचे पहावयास मिळाले आहे.

दिग्गज कंपन्यांमध्ये आयटीसीचे समभाग सर्वाधिक सहा टक्क्यांनी घसरले आहेत. यासोबतच हिंदुस्थान युनिलिव्हर, टायटन, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट आणि पॉवरग्रिड कॉर्पचे समभाग नुकसानीत राहिले आहेत. दुसऱया बाजूला टेक महिंद्रा, लार्सन ऍण्ड टुब्रो, इन्फोसिस, बजाज फिनसर्व्ह, कोटक बँक आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग तेजीत राहिले आहेत.

देशातील विविध राज्यांमध्ये कोरोना महामारीच्या दुसऱया लाटेतील नियमावलीत बऱयापैकी शिथिलता करण्यात आल्यानंतर आता सणासुदीच्या कालावधीत काही राज्यात पूर्ण शिथिलता मिळत असल्याचा फायदा उद्योग व्यवसायांना आपली कामगिरी मजबूत करण्यासोबत अर्थव्यवस्थेला चालना देण्यास मोठी मदत होणार असल्याचेही अभ्यासक सांगतात. याचा लाभ बाजारातील घडामोडींना होणार असल्याचेही म्हटले जात आहे.

Related Stories

जेफ बेझोस ठरले सर्वात श्रीमंत व्यक्ती

Amit Kulkarni

दुसऱया सत्रात सेन्सेक्स 465 अंकांनी घसरला

Patil_p

कर्मचारी कपात : एअरबसचे 1.35 लाख कर्मचाऱ्यांना पत्र

prashant_c

सोन्याच्या दरात 2600 रुपयांची घसरण

tarunbharat

जूनमध्ये 4.27 कोटी ई-वे बिलाचे सादरीकरण

Patil_p

लार्सन टुब्रोला मिळाले कंत्राट

Patil_p
error: Content is protected !!