तरुण भारत

आत्मघाती दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना भूखंड

तालिबानसाठी देशाचे नायक -सिराजुद्दीन हक्कानीची घोषणा

वृत्तसंस्था / काबूल

Advertisements

अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवटीतील अंतर्गत मंत्री आणि हक्कानी नेटवर्कचा म्होरक्या सिराजुद्दीन हक्कानीने तालिबानच्या आत्मघाती दहशतवाद्यांच्या कुटुंबांची भेट घेतली आहे. या दहशतवाद्यांनी तालिबानसाठी विविध हल्ले घडवून आणत स्वतःला स्फोटकांद्वारे उडवून लावले होते. काबूलमध्ये इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलमधील भेटीदरम्यान हक्कानीने या आत्मघाती दहशतवाद्यांना धर्म आणि देशाचे नायक ठरविले आहे. सर्व आत्मघाती दहशतवाद्यांच्या कुटुंबांना भूखंड देण्याची घोषणाही हक्कानीने केली आहे.

तालिबानच्या अंतर्गत मंत्रालयाने हॉटेलमध्ये आत्मघाती दहशतवाद्यांच्या पुटुंबीयांची भेट घेतानाची हक्कानीची छायाचित्रे प्रसारित केली आहेत. सर्व छायाचित्रांमध्ये हक्कानीच्या चेहऱयाला ब्लर करण्यात आले आहे. स्वतःच्या भाषणात हक्कानीने या आत्मघाती हल्लेखोरांच्या कथित बलिदानाचे कौतुक केले आहे.

आत्मघाती दहशतवादी हे देश आणि धर्माचे नायक आहेत. त्यांच्या आकांक्षांसह विश्वासघात करणे आम्ही टाळायला हवे असे म्हणत हक्कानीने मारले गेलेल्या आत्मघाती दहशतवाद्यांच्या कुटुंबांना 10 हजार अफगाणी रुपये आणि कपडे देखील दिले आहेत.

सिराजुद्दीन हक्कानी कोण?

सिराजुद्दीन हक्कानी हा जगातील अत्यंत क्रूर दहशतवादी संघटनांपैकी एक हक्कानी नेटवर्कचा म्होरक्या आहे. सिराजुद्दीनला तालिबानच्या नव्या राजवटीत अफगाणिस्तानचा अंतर्गत मंत्री करण्यात आले आहे. हे पद अन्य देशाच्या गृहमंत्र्यासमान आहे. सिराजुद्दीन मुजाहिदीन कमांडर जलालुद्दीन हक्कानीचा पुत्र आहे. हक्कानी नेटवर्क पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तालिबानच्या वित्तीय तसेच सैन्य संपत्तीची देखरेख करते.

मोस्ट वाँटेड दहशतवादी

अमेरिकेने सिराजुद्दीनला मोस्ट वाँटेड दहशतवादी घोषित केले आहे. हक्कानीनेच अफगाणिस्तानात आत्मघाती हल्ल्यांची सुरुवात केल्याचे काही तज्ञांचे मानणे आहे. हक्कानी नेटवर्कला अफगाणिस्तानातील अनेक हाय-प्रोफाइल हल्ल्यांसाठी जबाबदार मानले जाते. हक्कानीने तत्कालीन अफगाण अध्यक्ष हामिद करझाई यांच्या हत्येचाही प्रयत्न केला होता. याचबरोबर हक्कानी नेटवर्कने भारतीय दूतावासावर आत्मघाती हल्ला केला होता. सिराजुद्दीनचे वय 40 ते 50 वर्षांदरम्यान असल्याचे मानले जाते.

काबूलमध्ये वर्चस्व

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये हक्काने नेटवर्कच्या दहशतवाद्यांद्वारे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय स्वतःचा कट तडीस नेत आहे. हक्कानी नेटवर्कमध्ये जादरान समुदायाचे प्रभुत्व असून या समुदायाच्या दहशतवाद्यांचे काबूल-जलालाबादपासून खैबर सीमेपर्यंत नियंत्रण आहे. हक्कानी बंधूंच्या नेतृत्वाखाली काबूलच्या रस्त्यांवर किमान 6 हजार दहशतवादी आधुनिक शस्त्रास्त्रांसह गस्त घालत आहेत.

Related Stories

सहा दहशतवाद्यांचा खात्मा दोन जवानांना हौतात्म्य

Amit Kulkarni

केरळनंतर तामिळनाडूतही निपाहचा रुग्ण

Patil_p

जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी अध्यक्षपदी डॉ. हर्षवर्धन

Patil_p

बंगालमध्ये पहिल्यांदाच काँग्रेस-डाव्यांना भोपळा

Patil_p

देशात निम्याहून अधिक रूग्णांची कोरोनावर मात

Patil_p

पुढील आठवड्यापासून ‘स्पुटनिक-व्ही’ मिळणार

Amit Kulkarni
error: Content is protected !!