तरुण भारत

नियंत्रण रेषेवरील स्थितीचा सैन्यप्रमुखांनी घेतला आढावा

अन्य सुरक्षा यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी देखील दाखल

वृत्तसंस्था  / श्रीनगर

Advertisements

काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढलेले असताना सैन्यप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी तेथील दौरा केला आहे. त्यांनी नियंत्रण रेषेवर स्थितीचा आढावा घेतला आहे. सैन्यप्रमुखांनी व्हाइट नाइट कॉर्प्सच्या फॉरवर्ड एरियाजचाही दौरा केला आहे. सैन्यानुसार कमांडर्सनी त्यांना स्थितीची जाणीव करून देत घुसखोरी रोखण्यासाठीच्या मोहिमांची माहिती दिली आहे.

सैन्यप्रमुखांसह सीआरपीएफ महासंचालक कुलदीप सिंह देखील श्रीनगरमध्ये दाखल झाले आहेत. त्यांना उर्वरित सुरक्षा दलांसोबत सीआरपीएफच्या दहशतवादविरोधी मोहिमांबद्दल सांगितले गेले आहे.

उच्चस्तरीय दौऱयांना वेग

वायुदलाचे प्रमुख व्ही.आर. चौधरी 17 ऑक्टोबर रोजी लडाखमध्ये होते. पद सांभाळल्यावर पहिल्यांदाच तेथे जात त्यांनी सीमावर्ती भागांचा दौरा केला आहे. त्यांनी वायुदलाच्या युनिट्सच्या मोहिमात्मक सज्जतेचा आढावा घेतला आणि वायुतळावर तैनात वायूसैनिकांसोबत संवाद साधला होता. गृहमंत्री अमित शाह देखील लवकरच जम्मू-काश्मीरच्या दौऱयावर जाणार आहेत. कलम 370 हद्दपार झाल्यावर शाह यांचा हा पहिला काश्मीर दौरा असणार आहे.  सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेवरून गृहमंत्री अनेक बैठका घेणार असल्याचे समजते.

Related Stories

नोटबंदी ही ‘देशाची आपत्ती’: प्रियांका गांधी

Sumit Tambekar

मार्चपर्यंत सर्व रेल्वेगाडय़ा सुरू होणार

Patil_p

बिहार : 15 बंडखोर नेत्यांची जनता दलातून हकालपट्टी

datta jadhav

दिल्लीतील कोरोना : मागील 24 तासात 255 नवे रुग्ण ; संसर्ग दर 0.35%

Rohan_P

हल्ल्याचा धोका, राम मंदिरासाठी विशेष तयारी

Patil_p

देशात नव्या रुग्णांमध्ये घट झाल्याने दिलासा

Patil_p
error: Content is protected !!