तरुण भारत

गँगस्टर सुरेश पुजारीला फिलिपाईन्समध्ये अटक

प्रतिनिधी/ मुंबई

मुंबई पोलिसांच्या ताब्यातील रवी पुजारीचा एकेकाळचा हस्तक सुरेश पुजारीच्या फिलिपाईन्समध्ये मुसक्या आवळण्यात आल्याने एकच खळबळ माजली आहे. अमेरिकेतील तपास यंत्रणा एफबीआयने दिलेल्या माहितीवरून फिलिपाईन्सच्या स्थानिक पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या असून, त्याच्या प्रर्त्यापणासाठी भारत सरकारने तत्काळ हालचाली सुरू केल्या आहेत.

Advertisements

मुंबई क्राईम ब्रांचने पुजारीवर दाखल गुह्यांचे डोर्जियर बनविण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत त्याच्यावर 40 गुह्यांची नोंद असून त्यातील 16 खंडणीचे गुन्हे आहेत. गँगस्टर रवी पुजारीसाठी आधी तो काम करीत होता. मात्र खंडणीच्या वादातून दोघात वाद झाल्याने एकमेकांशी फारकत घेतली. त्यानंतर बनावट पासपोर्टच्या साह्याने त्याने प्रथम मलेशिया येथे आश्रय घेतला. येथून त्याने स्वतःची टोळी चालविण्यास सुरुवात केली. मात्र अमली पदार्थ तस्करीमुळेच तो तेथील स्थानिक पोलीस, आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणा आणि इंटरपोलच्या निशाण्यावर आला होता.

 त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबई पोलिसांसह तो सीबीआयच्या रडारवरही होता. मुंबई पोलिसांना ताबा मिळाल्यावर सुरेश पुजारी आणि रवी पुजारी यांची आमने-सामने चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई पोलीस सुरेश पुजारीचा ताबा घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

‘चित्रपट निर्माते महेश भट्ट यांच्या कार्यालयाबाहेर केला होता गोळीबार‘

 बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी तसेच खंडणी गोळा करण्यासाठी दिग्दर्शक महेश भट यांच्या कार्यालयाबाहेर पुजारीने गोळीबार केला होता. मात्र पोलिसांनी त्याच्या हस्तकांच्या मुसक्या आवळल्याने तो बॅकफूटवर गेला होता. तसेच नवी मुंबई, मुंबई आणि ठाण्यातील डान्सबार मालकांना तो पैसे उकळण्यासाठी नियमित फोन करायचा. पैसे न देणाऱयांवर गोळीबार करीत होता.  2018 मध्ये त्याच्या शूटर्सनी कल्याण, भिवंडी हायवेवर के. एन. पार्क हॉटेलला लक्ष्य करुन गोळीबार केला होता. रिसेप्शनवरील एक कर्मचारी या गोळीबारात जखमी झाला होता.

‘नवीन शूटर्सना देत होता काम’

गुन्हेगारी क्षेत्रात नवखे असलेल्या गुन्हेगारांना पुजारी काम देत असे. अवघ्या 10 ते 15 हजार रुपये देत या गुन्हेगारांना तो खंडणी तसेच गोळीबार करण्याचे काम देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामध्ये बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, झारखंड येथील गुन्हेगारांचा भरणा अधिक होता.

सुरेश पुजारी-रवी पुजारी यांची आमने-सामने चौकशी करणार

 21 सप्टेंबरपासून सुरेश पुजारी फिलिपाईन्समध्ये असल्याची मुंबई पोलिसांना माहिती मिळाली होती. यावेळी पेंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून इंटरपोलला अलर्ट करण्यात आले होते. सुरेश पुजारीशी संबंधित सर्व माहिती इंटरपोलला देण्यात आली होती. अशातच अमेरिकन एफबीआयला त्याचे ठिकाण माहीत होताच त्यांनी स्थानिक पोलिसांना कळविले. त्यानुसार सुरेश पुजारीला 15 ऑक्टोबरला अटक करण्यात आली. त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबई पोलिसांसह तो सीबीआयच्या रडारवरही होता. मुंबई पोलिसांना ताबा मिळताच सुरेश पुजारी आणि रवी पुजारी यांची आमने-सामने चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबींचा खुलासे होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई पोलीस सुरेश पुजारीचा ताबा घेण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Related Stories

नियंत्रण रेषेवर आढळली ड्रोनसदृश्य वस्तू

datta jadhav

“देशाचा प्रत्येक नागरिक शेतकऱ्याबरोबर”

Abhijeet Shinde

नव्या रुग्णांचा आकडा 45 हजारांवरच!

Patil_p

कृषी कायद्यांविरोधात २७ सप्टेंबरला भारत बंद, राकेश टिकैतांची घोषणा

Abhijeet Shinde

पदवी अंतिम वर्ष-सेमिस्टर वगळता इतर विद्यार्थी परीक्षेविना उत्तीर्ण

Patil_p

12 वर्षांवरील मुलांसाठी लस तयार; फायझरने मागितली केंद्राकडे फास्ट ट्रॅक मंजुरी

Rohan_P
error: Content is protected !!