तरुण भारत

आर्यन खानच्या समर्थनार्थ शिवसेनेची याचिका

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

अंमली पदार्थ प्रकरणी अटकेत असलेला आर्यन खान याच्या सुटकेसाठी शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे. आर्यन खान याच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली होत असून त्यासाठी त्याला अटक केलेल्या अधिकाऱयांचीच चौकशी करण्यात यावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. ही याचिका शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी सादर केली आहे.

Advertisements

आर्यन खान याला एका क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रसंगी अटक करण्यात आली होती. त्याच्यासह एक महिला मॉडेल आणि अन्य जणांनाही अटक करण्यात आली. सध्या आर्यन खान ऑर्थर रोड कारागृहात असून त्याच्या जामीन अर्जावर अद्याप निर्णय झालेला नाही. आज बुधवारी यावर पुढील सुनावणी आहे.

अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे अधिकारी गेली दोन वर्षे विनाकारण बॉलिवुड कलाकारांना त्रास देत आहेत. त्यांच्या विरोधात अंमली पदार्थांच्या सेवनाच्या तक्रारी दाखल करुन घेऊन चौकशीचा ससेमिरा मागे लावण्यात आला आहे. यासाठी या अधिकाऱयांचीच चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून करण्याचा आदेश देण्यात यावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

भाजपची कठोर टीका

शिवसेना आता ड्रग माफियांचे समर्थन करण्याच्या पातळीपर्यंत येऊन पोहचली आहे, हे आश्चर्यकारक आहे, अशी टीका भाजपने केली आहे. भाजप आर्यन खान किंवा शाहरुख खान यांच्या व्यक्तीशः विरोधात नाही. मात्र, अंमली पदार्थांच्या संबंधातील गुन्हय़ांच्या आरोपांमध्ये ज्यांना अटक झालेली आहे, त्यांचे समर्थन करण्यासाठी शिवसेना पुढे येते हे क्लेषदायक आणि धक्कादायक आहे, असे भाजपने आपल्या वक्तव्यात स्पष्ट केले आहे.

Related Stories

छोट्या वयात मोठी कमाल

Patil_p

जम्मू काश्मीरमधील कोरोना रुग्णांनी पार केला 75 हजारांचा आकडा

Rohan_P

काँग्रेसचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींच्या भेटीला

datta jadhav

बिहार : निवडणुकीपूर्वी नितीश सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Rohan_P

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सलमानला अटक

Rohan_P

इंदोर पोलिसांची वेबसाइट हॅक

Patil_p
error: Content is protected !!