तरुण भारत

ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत जोकोविचचा सहभाग अनिश्चित

वृत्त संस्था/ बेलग्रेड

2022 टेनिस हंगामात मेलबर्न येथे होणाऱया ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत सर्बियाचा टॉप सीडेड टेनिसपटू नोव्हॅक जोकोविचचा सहभाग अनिश्चित असल्याची चर्चा सुरू आहे. या स्पर्धेवेळी कोरोना लसीची सक्ती करण्यात येणार असल्याने जोकोविच स्पर्धेतून माघार घेऊ शकतो, असे संकेत आहेत. आपण कोरोनाची लस घेतली आहे का, याबद्दल जोकोव्हिचने मौन बाळगले आहे.

Advertisements

2021 टेनिस हंगामात जोकोव्हिचने ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेचे जेतेपद मिळविले. पण, यंदा तो जेतेपद कायम राखण्यासाठी सहभागी होणार का, हे अद्याप निश्चित झालेले नाही.

ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा व्हिटोरिया राज्यामध्ये घेतली जाते आणि व्हिक्टोरिया प्रशासनाने कोरोना संदर्भातील काही नियम कडक केले आहे. व्यावसायिक ऍथलिट्सना कोरोना लस घेतलेले असणे सक्तीचे आहे. त्या पार्श्वभूमीवर, जोकोविचने लस घेतली नसेल तर त्याच्या सहभागात अडचण येऊ शकते.

प्रत्येक टेनिस हंगामात ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम ही पहिली टेनिस स्पर्धा घेतली जाते. जोकोविचने आतापर्यंत विक्रमी नऊवेळा ही स्पर्धा जिंकली आहे. 34 वर्षीय जोकोविचने आपला शेवटचा सहभाग अमेरिकन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत दर्शविला होता. चालू वर्षीच्या टेनिस हंगामात जोकोव्हिचने तीन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा जिंकल्या. पण, अमेरिकन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत रशियाच्या मेदव्हेदेवने जोकोविचचा अंतिम सामन्यात पराभव केल्याने जोकोविचचे गोल्डन स्लॅमचे स्वप्न भंगले होते.

जोकोविच, फेडरर आणि नदाल या तीन टेनिसपटूंनी आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत विक्रमी प्रत्येकी 20 ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. टयुरिनमध्ये 2021 टेनिस हंगामातील शेवटची एटीपी अंतिम स्पर्धा होणार आहे. आगामी पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेत जोकोविचने सहभागी होण्याचे ठरविले आहे.

Related Stories

इंग्लंडसमोर ‘सेमीफायनल’चे टार्गेट

Patil_p

सर्बियाच्या जोकोव्हिचचा पराभव

Patil_p

ऑस्ट्रेलिया-विंडीज टी-20 मालिका लांबणीवर

Patil_p

संदेश झिंगनची जर्सी निवृत्त करणार

Patil_p

विंडीज अ संघात पूरनचा समावेश

Omkar B

ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा लांबणीवर?

Patil_p
error: Content is protected !!