तरुण भारत

भरत अरूण, आर. श्रीधर पुन्हा इच्छुक नाहीत

वृत्त संस्था/ नवी दिल्ली

भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचे गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपद भूषविणारे अनुक्रमे भरत अरूण आणि आर श्रीधर यांनी आपण पुन्हा या पदासाठी  इच्छुक नसल्याचे सांगितले आहे.

Advertisements

सध्या भरत अरूण भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाज प्रशिक्षक तर आर श्रीधर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. येत्या विश्वचषक स्पर्धेनंतर त्यांची मुदत संपत आहे. मागील रविवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विविध प्रक्षिशकपदासाठी अर्ज मागविण्याची जाहिरात प्रसिद्ध केली. बीसीसीआयकडून भरत अरूण आणि आर श्रीधर यांना मुदतवाढ मिळण्याची चिन्हे नसल्याचे जाणवल्याने या दोन्ही प्रशिक्षकांनी पुन्हा अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची नियुक्ती निश्चित झाली असून आगामी होणाऱया आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर राहुल द्रविड प्रशिक्षकपदाची सुत्रे हाती घेणार असल्याचे समजते. टी-20 क्रिकेट स्पर्धेपर्यंत रवि शास्त्राrकडे प्रशिक्षकपदाची सूत्रे राहतील. येत्या मे महिन्यात रवी शास्त्राr 60 व्या वर्षांत पदार्पण करीत आहे.

बेंगळूरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची सर्व जबाबदारी राहुल द्रविडकडे सोपविण्यात आली होती. आता भारतीय क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी द्रविडची नियुक्ती झाल्याने या अकादमीच्या प्रमुखपद रिक्त झाली आहे. या पदासाठी लवकरच एका अनुभवी व्यक्तीची नियुक्ती केली जाईल, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळामध्ये सुरू आहे.

Related Stories

चौथ्या दिवसाचा खेळ निर्णायक ठरला

Patil_p

डेव्हिस चषक टेनिस सर्बिया उपांत्य फेरीत

Amit Kulkarni

इमा रॅडूकनूची सराव स्पर्धेतून माघार

Patil_p

आघाडीच्या स्थानासाठी आज चेन्नई-दिल्ली लढत

Patil_p

जोफ्रा आर्चरवर उद्या शस्त्रक्रिया

Patil_p

गरीब कुटुंबांना शाहबाज नदीमकडून मदतीचा हात

Patil_p
error: Content is protected !!