तरुण भारत

श्रीलंका-आयर्लंड आज महत्त्वाची लढत

वृत्त संस्था/ अबु धाबी

आयसीसीच्या येथे होणाऱया टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम बारा संघामध्ये स्थान मिळविण्यासाठी सुरू असलेल्या पात्र फेरीच्या स्पर्धेत बुधवारी येथे माजी विजेता श्रीलंका आणि आयर्लंड यांच्यात महत्त्वाचा सामना खेळविला जाणार आहे. या सामन्याला बुधवारी भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होईल.

Advertisements

पात्र फेरीच्या स्पर्धेतील श्रीलंका आणि आयर्लंड यांनी आपले पहिले सामने जिंकले आहेत. लंकेने नामीबियाचा तर आयर्लंडने हॉलंडचा 7 गडय़ांनी पराभव केला आहे. बुधवारच्या सामन्यात विजय मिळविणारा संघ सुपर 12 संघात स्थान मिळविण्याच्या समीप पोहचणार आहे. पात्र फेरीच्या पहिल्या सामन्यात लंकेने नामीबियाचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले तर आयर्लंडने भेदक गोलंदाजीच्या जोरावर हॉलंडला पराभूत केले. या सामन्यात आयर्लंडच्या कँफरने 4 सलग चेंडूत चार बळी घेण्याचा विक्रम नोंदविला.

बुधवारच्या सामन्यात लंकेला आपल्या फलंदाजीत सुधारणा करावी लागेल. कुशल परेरा, निशांका, चंडीमल, अविश्का फर्नांडो आणि भानुका राजपक्षे यांना आपल्या फलंदाजी सातत्य दाखवावे लागेल. कुमारा, करूणारत्ने आणि चमिरा हे लंकेचे प्रमुख गोलंदाज आहेत. आयर्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर लंकेच्या फलंदाजीची सत्वपरिक्षा ठरणार आहे.

Related Stories

न्यूझीलंड महिला संघाच्या कर्णधारपदी सोफी डेव्हाईन

Patil_p

सित्सिपस- रूबलेव्ह यांच्यात अंतिम लढत

Patil_p

जिम्नॅस्टिक फेडरेशनची पुनर्रचना लवकरच

Amit Kulkarni

भारत-इंग्लंड मालिकेसाठी स्टेडियम ‘हाऊसफुल्ल’!

Patil_p

टेनिस संघटनेच्या अध्यक्षपदी अनिल जैन यांची निवड निश्चित

Patil_p

अर्जेंटिना-पराग्वे सामना बरोबरीत

Patil_p
error: Content is protected !!