तरुण भारत

श्रीकांत, समीर यांची विजयी सलामी

वृत्त संस्था/ ओडेन्सी

येथे सुरू असलेल्या 850,000 डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या डेन्मार्क खुल्या सुपर 1000 आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत आणि समीर वर्मा यांनी पुरूष एकेरीत विजयी सलामी दिली.

Advertisements

मंगळवारी येथे झालेल्या पुरूष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात किदांबी श्रीकांतने आपल्याच देशाच्या बी.साई प्रणितचा केवळ 30 मिनिटांच्या कालावधीत 21-14, 21-11 असा पराभव करत विजयी सलामी दिली. श्रीकांतने 2017 साली या स्पर्धेत पुरूष एकेरीचे जेतेपद पटकाविले होते.

दुसऱया एकेरी सामन्यात 28 व्या मानांकित समीर वर्माने आयर्लंडच्या व्हिटीडेसनचा 21-17, 21-14 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. हा सामना 43 मिनिटे चालला होता. मात्र पुरूष दुहेरीच्या सामन्यात भारताच्या मनु अत्री आणि सुमीत रेड्डी यांचे आव्हान पहिल्याचे फेरीत समाप्त झाले. मलेशियाच्या फेई आणि इजुद्दिन या जोडीने अत्री आणि रेड्डी यांचा 21-18, 21-11 असा पराभव केला.

Related Stories

रिचर्डसनला ऑलिम्पिक हुकणार

Patil_p

विजयी घोडदौड कायम ठेवण्यास दिल्ली उत्सुक

Patil_p

श्रीकांत, सिंधु यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात

Amit Kulkarni

फलंदाजीत विराट-रोहित, गोलंदाजीत बुमराह आघाडीवर

Patil_p

रुमानियाची हॅलेप उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

चॅम्पियन्स लीग फायनल इस्तंबूलमध्ये

Patil_p
error: Content is protected !!