तरुण भारत

एकवीस झिरो अन् आबा हिरो

खंडाळ्याच्या साखर कारखान्यात सत्तांतर – परिवर्तन पॅनलच्या विजयावर शिक्कामोर्तब

प्रतिनिधी/ खंडाळा

Advertisements

सुमारे चार पंचवार्षिक बिनविरोधची परंपरा असणाऱया खंडाळ्याच्या साखर कारखान्यात सतांतर झाले आहे. दरम्यान बाळसिध्दनाथ संस्थापक पॅनल व शेतकरी विकास पॅनलमधील रणधुमाळीत शेतकरी परिवर्तन पॅनलने सर्वच्या सर्व 21 जागा जिंकत सत्ताधारी बाळसिद्धनाथ संस्थापक पॅनलचा धुव्वा उडवला.

  खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक 43 उमेदवारांनी उडी घेतली होती. तालुक्याचे जेष्ठ नेते शंकरराव गाढवे यांच्या नेतृत्वाखाली बाळसिध्दनाथ संस्थापक पॅनल विरोधात असणाऱया आमदार मकरंद पाटील, व्ही. जी. पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या शेतकरी परिवर्तन पॅनलमधील उमेदवारांच्यात आमने-सामने लढत झाली. प्रचाराच्या रणधुमाळीत दोन्ही गटाकडून टिकाटिप्पणी करत मतदारांना सत्तेसाठी साद घातली होती.     कारखान्याच्या निवडणुकीत दोन्ही पॅनलने प्रतिष्ठेची लढाई केली होती.

तालुक्याचा स्वाभिमान जागा करीत प्रचाराचा धुरळा उडविला गेला होता. त्यामुळे मतदानाची टक्केवारीही वाढली होती. कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक झाल्याने मतदारांचा अंदाज कोणालाच नव्हता, त्यामुळे प्रत्यक्ष गाठीभेटींवर भर देण्यात आला होता. वास्तविक कारखाना स्थापनेपासून सभासद बनवताना संस्थापकांनी लोकांना प्रेरित करून शेअर्स जमा केले होते. त्यामुळे ते मूळ विचारांशी ठाम राहतील अशी अपेक्षा होती. मात्र आमदार मकरंद पाटील यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून सभासदांनी परिवर्तनला साथ दिल्याचे स्पष्ट झाले आहे. 

तालुका पंचायत समितीच्या किसनवीर स्मारक सभागृहात मंगळवारी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे ऊस उत्पादक गट क्र. 1 मध्ये परिवर्तन पॅनलचे चंद्रकांत ढमाळ-3390 मते, दत्तानाना ढमाळ-3445 मते, अशोकराव गाढवे-3358 मते तर संस्थापक पॅनलचे शंकरराव गाढवे-2543 मते, अशोकराव ढमाळ-2224 मते, रविंद्र ढमाळ- 2199 मते तर अपक्ष संतोष देशमुख यांना 77 मते मिळाली. गट 2 मध्ये परिवर्तन पॅनलचे  नितीन भरगुडे पाटील-3532 मते, अनंत ऊर्फ राजेंद्र तांबे-3518 मते, विष्णू तळेकर-3426 मते तर संस्थापक पॅनलचे चंद्रकांत यादव-2190 मते, संजय पानसरे-2254 मते, साहेबराव महांगरे-2333 मते मिळाली.

गट क्र. 3 मध्ये परिवर्तन पॅनलचे विश्वनाथ पवार-3469 मते, रमेश धायगुडे -3495 मते, किसन धायगुडे-3535 मते तर संस्थापक पॅनलचे नारायणराव पवार -2281 मते, विशाल धायगुडे-2387 मते, संजय गायकवाड-2192 मते मिळाली.  इतर मागास प्रतिनिधीमध्ये परिवर्तन पॅनलचे सुरेश रासकर-4285 मते, तर संस्थापक पॅनलचे दिनकर राऊत-2823 मते मिळाली. भटक्या विमुक्त जाती प्रतिनिधीमध्ये परिवर्तन पॅनलचे विठ्ठल धायगुडे-4297 मते, तर संस्थापक पॅनलचे उत्तम धायगुडे-2807 मते मिळाली. अनुसुचित जाती प्रतिनिधीमध्ये परिवर्तन पॅनलचे रत्नकांत भोसले-4462 मते, तर संस्थापक पॅनलचे भरत जाधव- 641 मते मिळाली. संस्था गट प्रतिनिधी मध्ये परिवर्तन पॅनलचे गजानन धुमाळ-826 मते , तर संस्थापक पॅनलचे संजीव ऊर्फ अनिरुध्द गाढवे- 69 मते मिळाली.

गट क्र. 4 मध्ये परिवर्तन पॅनलचे ज्ञानेश्वर भोसले 3560, महादेव भोसले 2325, हणमंतराव साळुंखे 3405, साहेबराव कदम 3453, तर संस्थापक पॅनलचे  मनोज पवार 2276, श्रीपाद देशपांडे 2257, परिवर्तन पॅनलचे किसनराव ननावरे 3433, धनाजी अहिरेकर 3508, शिवाजीराव शेळके पाटील 3505, तर संस्थापक पॅनलचे पुरुषोत्तम हिंगमिरे 2248, प्रदीप क्षीरसागर 2213, बापूराव धायगुडे 2397, यांच्यासह महिला राखीवमध्ये परिवर्तन पॅनलचे शालिनी पवार, शोभा नेवसे, तर संस्थापक पॅनलचे अनिता भोसले, इंदुमती पाटील या उमेदवारांची मते प मिळू शकली नाहीत.

राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रणित शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचे ऊस उत्पादक गटातील उमेदवार साधारणपणे 1000 मतांच्या फरकाने विजयी झाले. राखीव जागांचे पाचही उमेदवार 1500 मतांच्या फरकाने विजयी झाले तर संस्था गटातील उमेदवार 457 मतांनी विजयी झाले आहेत.

Related Stories

जावलीत चार रुग्णांची भर!

Patil_p

परखंदळे: पंचवीस वर्षातील रेशन भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी

Abhijeet Shinde

केरळमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाश्यांना कोरोना टेस्ट अनिवार्य

Rohan_P

कास पुष्प पठारचा हंगाम समाप्तीकडे…

datta jadhav

सोलापूर ग्रामीण भागात 3 नवे रुग्ण, एकाचा कोरोनाने मृत्यू

Abhijeet Shinde

पुण्यातील शाळा 30 जानेवारीपर्यंत राहणार बंद

Sumit Tambekar
error: Content is protected !!