तरुण भारत

गुटखा विरोधी कारवाईत अकरा जणांवर गुन्हा

प्रतिनिधी/ फलटण

फलटण ग्रामीण पोलिसांनी गुटखा विरोधात केलेल्या कारवाईत तंबाखूजन्य मुद्देमाल जप्त करत 11 जणांच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी ग्रामीण पोलीस कर्मचाऱयांना ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावात तंबाखूजन्य माल व गुटका विक्री होत असलेल्या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश देऊन 11 ठिकाणी छापे टाकत कारवाई केली. यामध्ये पहिल्या कारवाईत साखरवाडी येथे पोपट तुकाराम ठोंबरे यांच्याकडे 100 रुपये किमतीच्या तंबाखूजन्य माल विक्री, साखरवाडी येथे महेश दत्तात्रय रोकडे यांच्याकडे 293 रुपये किमतीच्या तंबाखूजन्य माल, निंभोरे येथे मुकुंदा विष्णू कांबळे यांच्याकडे 300 रुपये किमतीचा तंबाखूजन्य माल, मिरगाव येथे हनुमंत किराणा दुकानात दादासो ज्ञानदेव खताळ यांच्याकडे 350 रुपये किंमतीचा तंबाखूजन्य माल आढळून आला. आसू येथे फिरोज मजीर महाल यांच्याकडे 725 रुपये तंबाखूजन्य माल, ढवळेवाडीत शैलेंद्र एकनाथ नलवडे यांच्याकडे 417 रुपये तंबाखूजन्य माल,  ढवळेवाडी दिनेश बुवा माने यांच्याकडे 400 रुपये माल विक्री, सस्तेवाडी रघुनाथ मार्तंड पायगुडे यांच्याकडे 500 रुपय sमाल, साखरवाडी संजय यशवंत देवकर यांच्याकडे 650 रुपये माल, आसू येथे मनोहर दत्तात्रय पवार यांच्याकडे 450 रुपये माल, आसू येथे विजय ज्ञानदेव निंबाळकर यांच्याकडे 425 रुपये माल आढळून आला. असे एकूण 11 जणांच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धान्यकुमार गोडसे यांनी दिली आहे.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक अजित बोराडे, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक धान्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अरगडे, स.पो.फौ सूर्यवंशी, पो. ह तुकाराम सावंत, पो. ना तानाजी काळेल, पो.ना हरिदास दराडे, पो.ना धराडे, पो.ह प्रकाश खाडे, पो. ह संजय राऊत, पो. ह अमोल कर्णे, पो.ह बबन साबळे, पो. ह मोहन हांगे, पो. ह संतोष विरकर, पो. ह. टिळेकर यांनी केली.

Related Stories

कोयना धरणात पाणी मावेना!

Patil_p

साडेचार लाखाचा अवैध गुटखा जप्त

Patil_p

कासची उंची वाढली… आमच्या रस्त्याचं काय?

Patil_p

पदवीधर आणि शिक्षक मतदार निवडणुकीमुळे मतदारांची होणार दिवाळी

Patil_p

यंदा एक महिना रस्ता सुरक्षा अभियान

Patil_p

मी आलो म्हणजे शेतकयांना न्याय मिळणारच : प्रवीण दरेकर

Patil_p
error: Content is protected !!