तरुण भारत

मासे खाण्यासाठीही आता कॅलेंडर!

घटत्या मत्स्य उत्पादनावर मात करण्याची कॅलेंडरची निर्मिती

प्रतिनिधी/ रत्नािगरी

Advertisements

समुद्रातील माशांच्या घटत्या संख्येचे प्रमाण पाहता काही वर्षानंतर समुद्रातून मासळी गायब होण्याची भीती तज्ञांनी व्यक्त केली आह़े माशांच्या प्रजनन हंगामानार मासे पकडण्याचे व खाण्याचे नियोजन केले तर यावर मात करता येईल, असे मत नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस, बेंगळुरूचे माजी विद्यार्थी पूजा राठोड, मयुरेश गांगल आणि चेतना पुरुषोत्तम यांनी व्यक्त केले आहे. यासाठी त्यांनी चक्क एक पॅलेंडरच तयार केले आह़े ‘नो युवर फिश’ असे या कॅलेंडरचे नाव असून यामुळे मासळीच्या शाश्वत वापराला प्रोत्साहन मिळण्याचा दावा करण्यात आला आह़े

प्रजनन हंगामानुसार तसेच माशांच्या प्रमाणाच्या आधारावर कोणत्या काळात कोणते मासे खावे, कोणते टाळावे यासाठी हे पॅलेंडर 2017 मध्ये सर्वप्रथम तयार  करण्यात आले. पावसाळ्य़ात मासेमारी बंदी कालावधी असत़ो मात्र या कालावधीमध्ये सरसकट सर्वच माशांचा प्रजननाचा हंगाम नसत़ो अनेकजण या कालावधीत मासे खाणे टाळतात, परंतु माशांच्या शाश्वत वापराला प्रोत्साहन देण्यासाठी हे पुरेसे नाह़ी ‘नो युवर फिश’-संस्थापकांच्या म्हणण्यानुसार, समुद्रातील घटत्या मासळीच्या संख्येमुळे गुजरातमधील मच्छीमारांनी मासेमारी बंदी कालावधी 91 ते 120 दिवस करावा, अशी मागणी केली आह़े नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस, बेंगळुरूचे माजी विद्यार्थी पूजा राठोड, मयुरेश गांगल आणि चेतना पुरुषोत्तम यांनी तीन वर्षांच्या संशोधनानंतर यासाठी एक संकेतस्थळ सुरू केले आहे.

  देशाच्या पश्चिम किनाऱयावर 61 दिवसांची (1 जून ते 31 जुलै) वार्षिक मासेमारी बंदी आहे. सागरी जलक्षेत्रात मत्स्यसाठा पुन्हा निर्माण करण्यासाठी हा कालावधी राज्य सरकारने ठरवला आह़े सर्वसधारणपणे पावसाळी हंगाम माशांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करतो आणि पुनरुत्पादन कालावधीमध्ये सागरी अधिवासाचे संरक्षण करण्यासाठी महत्वपूर्ण आहे.

  राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाने विविध माशांच्या प्रजनन कालावधीबाबत शास्त्रज्ञांशी सविस्तर चर्चा केली पाहिजे आणि त्यानुसार मान्सून बंदी घातली पाहिजे. उदाहरणार्थ पापलेटचा प्रजनन कालावधी मे मध्ये आहे तर इतर माशांचा प्रजनन कालावधी जूनमध्ये सुरू होत़ो आपल्याकडे पावसाळ्य़ात दोन महिन्यांची बंदी आणि जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये आणखी एक महिना मत्स्यबंदी केल्यामुळे मत्स्य उत्पादन घटण्याचे प्रमाण कमी होऊ शकते, असे महाराष्ट्र राज्य मत्स्य व्यवसाय संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी सांगितल़े

  बेसुमार मासेमारीच्या समस्येचा सामना करण्यासाठी अनेक पातळ्यांवर कारवाईची आवश्यकता आहे. नो युवर फिशच्या माध्यमातून आपण लोकांना संवेदनशील करू शकतो. सागरी पर्यावरणासाठी बहुतांश मत्स्याहारी ग्राहकांनी अशा उपक्रमांचे पालन केले तर त्याचा मागणीवर परिणाम होवू शकतो, असे सागरी जीवशास्त्रज्ञ आणि नो युवर फिशचे संस्थापक मयुरेश गांगल म्हणाल़े

  नो युवर फिश या गटाने सेंट्रल मरीन फिशरीज इन्स्टिटय़ुटकडून वैज्ञानिक माहिती तपासली आणि संकेतस्थळ तयार करण्यासाठी सहकाऱयांची मदत घेतली. त्यानुसार 12 लोकप्रिय माशांच्या प्रजातींवर प्रकाश टाकत त्याचे पॅलेंडरही तयार केले आह़े मत्स्य व्यवसाय शाश्वत टिकवण्यासाठी या गटाने काही हॉटेल्सशीही ज्या हंगामध्ये जी मासळी मिळते तेच पदार्थ ग्राहकांना देण्यात यावेत यासाठी करार केला आह़े

  2019 साली झालेल्या अभ्यासाअंती महाराष्ट्राच्या किनाऱयावरील माशांची संख्या अती मासेमारी आणि वातावरणातील बदल यामुळे वेगाने घटत आह़े   केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्थेच्या (सीएमएफआरआय) आकडेवारीनुसार, महाराष्ट्राने सागरी माशांच्या उपादनामध्ये 2019 मध्ये 32 टक्क्यांवर 2.01 लाख टनांची घट नोंदवली आहे, जी गेल्या 45 वर्षातील सर्वात कमी आहे. सीएमएफआरआयच्या एका अभ्यासानुसार बोंबील मासळीही लुप्त होण्याच्या मार्गावर आह़े

चौकट

          महिना ऑक्टोबर

हे खावे                  हे खाऊ नये

सरंगा (हलवा)       पापलेट

टायगर कोळंबी        सुरमई- तोवर

रावस              व्हाईट कोळंबी

कोळंबी            तारली

सौंदाळा            म्हाकूळ

बेंबिल             लहान मोरी-मुशी         

मांदेली             लेप

जिताडा            शेवंड

पेडवे              करली

           महिना नोव्हेंबर

sहे खावे              हे खाऊ नये

हलवा आणि सरंगा  व्हाईट कोळंबी

तारर्ली- हैद       बोंबिल

सुरमई-तवर       पापलेट

टायगर कोळंबी     सुळे

बांगडा           लहान मोरी-मुशी 

मांदेली           लेप

रावस             शेवंड

म्हाकूळ            जिताडा

करली             कोळंबी

सांदाळा            मोडोवसा

कुर्ली              बोडाव

कोकेरी            राणी मासा

गोब्रा              गेदर

Related Stories

प्रधानमंत्री किसान योजनेत तक्रारींचा पाऊस

Patil_p

मोफत ‘मोदी’ एक्सप्रेस

datta jadhav

मिरकरवाडा बंदरातच नौका दुरूस्तीसाठी जागा देण्याचे आदेश

Patil_p

जिल्ह्यात आणखी ३१ पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

गुहागर-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर चिखलात

Patil_p

रत्नागिरी जिल्हय़ातील कोविड मृत्यूदरात घट

Patil_p
error: Content is protected !!