तरुण भारत

इनरव्हील क्लब ऑफ म्हापसा एलिटतर्फे निवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱयांचा सत्कार

प्रतिनिधी /पणजी

इनर व्हील क्लब ऑफ म्हापसा एलिट व तालुकास्तरीय शाळा प्रकल्प समुहातर्फे  बार्देश तालुकास्तरीय शाळा प्रकल्प समितीमधील 51 सेवानिवृत्त कर्मचाऱयांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

Advertisements

हा सोहळा म्हापसा येथील ज्ञानप्रसारक विद्यालयाच्या सभागृहात झाला. 1 ऑगस्ट 2020 ते 31 जुलै या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱयांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण खात्याचे उपसंचालक शैलेश झिंगणे, तर सन्माननीय पाहुण्या म्हणून इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष प्रिया प्रताप परब तसेच तालुकास्तरीय प्रकल्प समुहाचे अध्यक्ष तथा ज्ञानप्रसारक विद्यालयाचे मुख्याध्यापक गुरुदास पालकर यांची उपस्थिती होती.

गुरुदास पालकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रमुख पाहुणे शैलेश झिंगणे यांनी आपल्या भाषणात सत्कारमूर्तींचे कौतुक केले व त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. 

इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष प्रिया परब आपल्या भाषणात म्हणाले की, शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांचे योगदान अतिशय मौल्यवान आहे. त्यांच्या हातून जबाबदार नागरिक घडत असतो. हे कार्य करत असताना त्यांच्याकडून देशसेवा घडत असते आणि म्हणूनच कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर बसणे हे एक समाजकार्य आहे आणि ते आम्ही करत आहोत. सत्कार आयोजनाची संधी प्राप्त करून दिल्याबद्दल तालुकास्तरीय शाळा प्रकल्प समूहाचे प्रिया परब यांनी आभार मानले. सर्व सत्कारमूर्तींना शैलेश झिंगडे, इनरव्हील अध्यक्षा प्रिया परब तसेच मुख्याध्यापक गुरुदास पालकर यांच्याहस्ते स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.

Related Stories

बोडगेश्वर देवस्थानचा आज 27वा वर्धापनदिन

Patil_p

’मोफत’ च्या नावाखाली दुप्पट दराने पाणी

Amit Kulkarni

मडगावचे न्यू मार्केट ठरल्याप्रमाणे बंद

Patil_p

सांखळी मतदातसघात हिंदू नववर्षाचे जोरदार स्वागत

Amit Kulkarni

बेफिकिर राहू नका, कोरोना कोणालाही धोका देऊ शकतो

tarunbharat

राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस

Patil_p
error: Content is protected !!