तरुण भारत

फोंडा येथील दुहेरी हत्याकांडातील संशयित गोव्यातील ‘घाडी’ नसून कर्नाटकातील ‘वडार’

बिगरगोमंतकीयातर्फे गोवेकरांची आडनावे धारण करण्याचा प्रकार गंभीर

प्रतिनिधी /फोंडा

Advertisements

फोंडा शहरात दिवसाढवळय़ा दोघा वृद्ध बहिणांचा निर्घृणरित्या खून करून पसार   झाल्यानंतर गजाआड करण्यात आलेला संशयित महादेव दुर्गा घाडी (34,) हा मूळ बाये-सुर्ला येथील गोमंतकीय ‘घाडी’ नसून तो मूळ कर्नाटक येथील ‘वडार’ आहे. त्याच्या वडीलाचे आडनाव ‘वडार’ असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

सुपरमार्केट-फोंडा येथील कामत रेसिडेन्सीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटात दोघा बहिणीचा धारदार शस्त्राने निघृण हत्या केल्याचा खळबजनक प्रकार शनिवार 16 ऑक्टो. रोजी दुपारी उघडकीस आला होता. मंगला तुळशीदास कामत (75) व जीवन क्यंकटेश कामत (65 निवृत्त नर्स) या दोन्ही बहिणींचा संशयिताने किचनमध्ये खून केला होता. सदर घटना 11 वा. सुमारास घडली होती. निवृत्त नर्स मयत जीवन व्यंकटेश कामत हिने संशयित महादेव याला दोन लाख रूपये उसने दिले होते. ते व्याजासह सुमारे 2 लाख 65 हजार रूपये इतके झाले होते. तिने ते परत देण्यासाठी तगादा लावण्यामुळेच दोघा सख्क्य़ा बहीणीचा खूनाचा प्रकार घडल्याची कबूलीही संशयिताने पोलीस तपासाअंती दिली आहे.

संशयिताच्या ‘घाडी’ नावावरून बाये-सुर्ला येथील लोकांनाही मनस्पात

सदर घटनेत या भागातील अन्य एका घाडी नामक युवकाचा फोटो वापरून सोशल मिडीयावर दुहेरी हत्याकांडप्रकरणी संशयित म्हणून बदनामी करण्यात येत आहे. त्यामुळे कोणताही संबंध नसताना त्या युवकाच्या कुटूंबियानाही मनस्ताप सहन करावा लागला आहे. याप्रकरणी त्या युवकाने पोलीस स्थानकात रितसर तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. संशयिताने धारण केलेल्या घाडी आडनावामुळे सुर्ला येथील घाडीवाडय़ाचे नाव चर्चेत असल्याने येथील नागरिकांनाही संताप व्यक्त केला आहे.

आज बिगरगोमंतकीय सर्रास गोव्यात जम बसविल्यानंतर गोमंतकीयाची आडनावे धारण करून मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करून घेतात. कायद्यात यांच्याविरोधात कोणतेच बंधन नाही. त्यामुळे यापुढे कळस गाठत गोव्यातील जमीनी विकत घेत ते सर्रास गोमंतकीय म्हणून मिरवतात. सदर संशयिताबाबतही हाच प्रकार घडला पोलीस जबानीतही तो आपण गोमंतकीयच असल्यावर ठाम राहिलेला आहे. मात्र खरा प्रकार त्याची कर्नाटक येथे लग्न करून दिलेली बहीण विचारपूस करण्यासाठी फोंडा पोलीस स्थानकात धडक दिल्यानंतर त्याचा खोटारडेपणा उघडा पडला.

संशयिताचे मूळ कुटूंबिय कर्नाटक येथील

संशयित महादेव दुर्गा घाडी याचे कुटूंबिय मूळ कर्नाटक येथील आहे. खाण कंपनीत कामाला असताना वेळगे येथील डी. बी. बांदोडकर कॉलनीत ते भाडय़ाने राहत होते. महादेव घाडी यांच्या वडीलाचे आडनाव ‘वडार’ हे असून त्याने नंतर गोव्यातील कायमस्वरूपी वास्तव्यानंतर आपले मतदार ओळखपत्रातही घाडी नाव बदलून घेतलेले आहे. बाये-सुर्ला येथील घर एका व्यक्तीचे घर बॅकचे हफ्ते थकल्याने लिलावात  काढण्यात आलेले होते. ते घर दुर्गा वडार यांने बॅकेचे कागदपत्री व्यवहार पुर्ण करून 30 वर्षापुवी घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे.    संशयित महादेव घाडी हा ठकसेन म्हणून सर्वत्र परिचीत आहे. त्याने वेर्णा येथील कंपनीतील आपल्या सहकाऱयाकडूनही पैसे उसने घेतले असल्याची माहिती तपासाअंती निष्पन्न झाली आहे. वेळीच संशयिताविरोधात सावधानता बाळगली असल्यास त्या वृद्ध बहिणींचा आज बळी गेला नसता. याप्रकरणी फोंडा पोलीस निरीक्षक मोहन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Related Stories

नेत्रावळीतील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येची दखल

Patil_p

फातोर्डाचा विकास गोव्याला अधिक प्रगतशील बनवेल

Amit Kulkarni

मडगाव नगरपालिकेची इमारत संवर्धन विभागात येते की नाही ?

Patil_p

माजाळी येथील चेकनाक्यावर 10 लाखांची दारू पकडली

Amit Kulkarni

गोव्यात सात दिवसांच्या गणपतीचे विसर्जन

GAURESH SATTARKAR

पांडुरंग मडकईकरांच्या पायाखालची वाळू घसरली

Amit Kulkarni
error: Content is protected !!