तरुण भारत

त्या कार्यकर्त्यांच्या ‘तृणमूल’ प्रवेशाने काँग्रेसवर परिणाम नाही

वाळपई काँग्रेस गटसमितीचा दावा

प्रतिनिधी /वाळपई

Advertisements

 वाळपई मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तृणमूल काँग्रेस पक्षात गेल्यामुळे काँग्रेसवर कोणताही परिणाम होणार नाही. वाळपईत काँग्रेस पक्ष भक्कम आहे. येणाऱया विधानसभा निवडणुकीत वाळपई मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवाराला भरघोस मतदान होणार आहे, असा दावा काँग्रेस गट समितीचे अध्यक्ष हरिश्चंद्र मानकर व इतर पदाधिकाऱयांनी पत्रकार परिषदेत केला.

 गेल्या तीन वर्षात काँग्रेस पक्षाच्या विकासासाठी कार्य करण्यात आले नाही. पक्षाकडून प्राप्त झालेला निधीचा व्यवस्थित वापर झाला नाही. काँग्रेस पक्षाला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. काँग्रेसने या मतदारसंघात एका प्रामाणिक काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची गट समितीच्या अध्यक्षपदी निवड केली. दशरथ मांदेकर, सुरेश कोदाळकर व त्यांच्या सहकाऱयांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही.

 वेळुस मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हरिश्चंद्र मानकर, रणजीत राणे, भालचंद्र मयेकर व अब्दुल गणी यांनी काँग्रेस पक्षावर आरोप करणाऱया दशरथ मांदेकर व इतरावर खरपूस टीका केली. गेल्या पाच वर्षांत काँग्रेस पक्षाने पक्षाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला नाही. या आरोपांचे  रणजीत राणे यांनी खंडन केले.  हरिश्चंद्र मानकर काँग्रेस पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते असून नगरगावचे उपसरपंच असून त्यांच्या पक्ष नि÷sची दखल घेऊन पक्षाने त्यांच्याकडे गट समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे. येणाऱया काळात ते ही जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडतील, असा विश्वास रणजीत राणे यांनी व्यक्त केला. येणाऱया विधानसभा निवडणुकीत भाजपा व काँग्रेस यांच्यामध्ये खरी लढत होणार आहे. वाळपई मतदारसंघांमध्ये विश्वजित राणे यांच्या विरोधात नाराजी आहे. त्याची प्रचिती विधानसभा निवडणुकीमध्ये येणार असल्याचे रणजीत राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related Stories

भाजप अल्पसंख्याकाचा विरेधात

Omkar B

पाटणा रेल्वे पकडण्यासाठी परप्रांतीय लोकांची वास्को रेल्वे स्थानकासमोर प्रचंड गर्दी

Amit Kulkarni

योगदीन ई-बूकचे भाजपा गोवा प्रभारी सी.टी. रवी यांच्याहस्ते प्रकाशन

Patil_p

सकाळी शाळा… दुपारी आंदोलन..!

Omkar B

हाताला काम नाही..आणि पुरेशे जेवणही नाही..!

Patil_p

सांखळी डॉ. हेडगेवार शाळेतर्फे ऑनलाईनद्वारे विविध सण साजरे

Patil_p
error: Content is protected !!