तरुण भारत

समिल वळवईकर यांच्याकडून दिवाडी बेटावर ऍम्ब्यलन्स सेवा

प्रतिनिधी / तिसवाडी

कुंभारजुवे मतदारसंघातील समाजसेवक तथा  काँग्रेस नेते समिल वळवईकर यांनी दिवाडी बेटावरील लोकांच्या वैद्यकीय मदतीसाठी ऍम्ब्यलन्स सेवा प्रदान केली आहे. दिवाडी बेटावरील मध्यवर्ती ठिकाणी  ही ऍम्ब्य?लन्स सज्ज असणार असून ती लोकांना अत्यंत कमी वेळेत उपलब्ध व्हावी यासाठी तिचा चालकही बेटावरीलच ठेवण्यात आला आहे. गरजवंत लोकांनी या आरोग्य सेवेचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन समिल वळवईकर यांनी केले आहे.

Advertisements

या सेवेच्या लोकार्पण सोहळय़ात ओम श्री शक्तिविनायक देवस्थानचे पुरोहित ……., अवर लेडी पायटी चर्चचे फादर मायरा?न, गोलती-नावेलीचे सरपंच मारिओ पिंटो, सां मातियशचे सरपंच मोहन वळवईकर, उपस्थित होते. त्याशिवाय पंच आशा पै,  पंच रमेश कुंकळकर, पंच सदानंद फडते, पंच एल्वीस आगियार, माजी सरपंच प्रशांत हरवळकर, माजी सरपंच मान्य?यल आझावेदो, माजी पंच ज्युलिओ   हेरेदिया, निकोलस रापोसो,  मोहन प्रियोळकर, तसेच अन्य मान्यवरांमध्ये पुरुषोत्तम फडते, प्रकाश शिरोडकर, प्रकाश रावळ, दिलीप शिंधोळकर उपस्थित होते.

यावेळी बोलताना समिल वळवईकर यांनी सांगितले की आपण ही ऍम्ब्यलन्स सेवा सुरू केली आहे ती माणुसकीचा धर्म म्हणून. तिचा योग्य वापर कसा करावा हे लोकांनी ठरवावे आणि लाभ घ्यावा. फादर मायरान म्हणाले की समिल वळवईकर यांनी हे फार चांगले देवकार्य केले आहे. त्यामुळे त्यांना देवाचे आशीर्वाद प्राप्त होतील. आत्ता आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की  सर्व भेदाभद विसरुन एकजूट होऊन समिल वळवईकर यांना भविष्यात पाठिंबा  देऊया, कारण समिल वळवईकर   यांच्यासारखा खरा समाजसेवक  विधानसभेत पोहोचणे आवश्यक आहे. मारिओ पिंटो यांनी वळवईकर यांच्या कार्याची प्रशंसा करून त्यांना धन्यवाद दिले आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Related Stories

मडगावात दिगंबर कामतच्या विरोधात भाजपचा उमेदवार कोण ?

Amit Kulkarni

गोवा बोर्डाची बारावी परीक्षा रद्द

Amit Kulkarni

मुख्यमंत्र्यांसमोरही ‘गो बॅक आयआयटी’

Patil_p

अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्चच्या अखेरीस

Amit Kulkarni

सांगेमध्ये राखीवतेवरून तीव्र पडसाद

Amit Kulkarni

योग हे भारताने जगाला दिलेले अमूल्य देणे

Amit Kulkarni
error: Content is protected !!