तरुण भारत

दोन वर्षानंतर मडगावात निघाला जुलूस

प्रतिनिधी /मडगाव

‘ईद-ए-मिलाद’चे औचित्य साधून काल मुस्लिम बांधवांनी दोन वर्षांनंतर काल मंगळवारी मडगाव शहरात जुलूस काढला. या जुलूस मध्ये मोठय़ा संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. कोविड-19 मुळे गेली सलग दोन वर्षे मुस्लिम बांधवांना जुलूस काढणे शक्य झाले नव्हते. मात्र, यंदा कोविडची परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने प्रशासनाने जुलूस काढण्यास मान्यता दिली होती.

Advertisements

इस्लाम धर्मात ईद मिलाद उन-नबी या उत्सवाचं अनन्य साधारण महत्व आहे. ईद-ए-मिलाद किंवा मालविद या नावानं देखील हा सण ओळखला जातो. काल या सणानिमित्त मडगाव परिसरातील विविध मशिदशी संबंधीत असलेल्या मुस्लिम बांधवांनी जुलूस काढला. त्यात हाऊसिंग बोर्ड दवर्ली, रूमडामळ, मालभाट, पाजीफोंड, फातोर्डा इत्यादी भागातील मुस्लिम बांधव जुलूसमध्ये सहभागी झाले होते.

हा जुलूस मालभाट येथील मशिदकडून हॉस्पिसियो मार्गे रवींद्र भवन पर्यंत गेला व नंतर तेथून कोलवा सर्कल पर्यंत जुलूस निघाला व नंतर त्याची सांगता झाली. दोन वर्षाच्या नंतर झालेल्या या जुलूसमध्ये सहभागी झालेल्या मुस्लिम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण होते. सुमारे तीन हजार बांधवांनी त्यात भाग घेतला होता. जुलूसच्या दरम्यान, कोणताच अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यात राखीव पोलीस दल तसेच खास कंमाडोचा समावेश होता.

Related Stories

…तर गोवा लवकर मुक्त झाला असता

Amit Kulkarni

विलास मेथर खूनप्रकरणी संतोष पिल्लई गजाआड

Patil_p

कॅसिनोमुळे राजधानी गजबली

Omkar B

बाणावली येथे कामगाराला लोखंडी साखळीने बांधून घातले

Patil_p

सोनसडय़ाचे कामकाज ‘शॅडो कौन्सिल’कडे सोपवा

Amit Kulkarni

भूमिपुत्र अधिकारिता विधेयकातून आक्षेपार्ह ‘भूमिपुत्र’ शब्द हटवा

Amit Kulkarni
error: Content is protected !!