तरुण भारत

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात स्वतंत्र ‘हृदयरूग्ण’ विभाग

सर्व ओपीडी कार्यरत : आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची माहिती

प्रतिनिधी /मडगाव

Advertisements

दक्षिण गोव्याचे नवे जिल्हा इस्पितळ पूर्ण क्षमतेने सुरू व्हावे हे दक्षिण गोव्यातील जनतेचे स्वप्न होते. हे स्वप्न साकार होत असून या ठिकाणी सर्व ओपीडी सुरू झाल्या आहेत. त्याच बरोबर या इस्पितळात स्वतंत्र असा ‘हृदयरूग्ण’ विभाग सुरू केला जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी काल मंगळवारी दिली.

हॉस्पिसियो इस्पितळाचे नव्या जिल्हा इस्पितळात स्थलांतर करण्यात आल्यानंतर काल आरोग्यमंत्री व़िश्वजीत राणे यांनी भेट देऊन पाहणी केली व एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नव्या जिल्हा इस्पितळात स्वतंत्र असा ‘हृदयरूग्ण’ (हृदयविकार) विभाग सुरू केला जाणार असल्याची माहिती दिली. या ठिकाणी हृदयरूग्ण विभाग सुरू झाल्यानंतर दक्षिण गोव्यातील लोकांना गोमेकॉत जावे लागणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सद्या नव्या जिल्हा इस्पितळात मेडिसिन विभाग तसेच स्त्रीरोग व बालरूग्ण विभाग स्थलांतरीत करण्यात आलेला आहे. काल या इस्पितळात सिझेरियनद्वारे पहिल्या बाळाचा जन्म झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या इस्पितळात सीटी स्कॅनची सुविधा उलपब्ध झाली असून या ठिकाणी रूग्णांवर सर्जरी केली जाणार आहेत. त्याच बरोबर कैशूअल्टी (अपघात) विभागही सुरू होणार आहे.

हल्ली अनेकांना ‘स्ट्रोक’ येण्याचे प्रमाण वाढले आहे. स्ट्रोक येणाऱया रूग्णावर तातडीने उपचार होणे आवश्यक असते. ही गरज ओळखून नव्या जिल्हा इस्पितळासाठी तज्ञ डॉ. सनद पाटकर यांची नियुक्त केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. त्याच बरोबर हृदयरूग्ण विभागाची जबाबदारी डॉ. गुरूप्रसाद यांच्याकडे सुपूर्द केली जाईल असे आरोग्यमंत्री म्हणाले.

नर्सिग कॉलेज करण्याचा प्रस्ताव पुढे नेणार

नव्या जिल्हा इस्पितळात नर्सिग कॉलेज सुरू करण्याचा सुरवातीचा प्रस्ताव होता, तोच प्रस्ताव पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री श्री. राणे यांनी दिली. जर नर्सिग कॉलेज सुरू झाले तर नर्सेसना चांगले प्रशिक्षण मिळेल तसेच इस्पितळातच त्यांना प्रशिक्षण घेता येईल. खासगी वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव मध्यतरी चर्चेत होता. त्यावर बोलताना आरोग्यमंत्री म्हणाले की, खासगी या शब्दाचा उल्लेख होताच वाद सुरू होतो. त्यामुळे आपल्याला कोणत्याही वादात शिरायचे नाही असे सांगून खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

हॉस्पिसियोचा जीर्णोद्धार करणार

म्हापसा येथील आझिलो इस्पितळाचा केंद्र सरकारकडून मिळालेल्या निधीतून जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. त्याच धर्तीवर मडगावच्या पुरातन हॉस्पिसियो इस्पितळाचा जीर्णोद्धार केला जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री श्री. राणे यांनी दिली. या पुरातन इस्पितळाने असंख्य रूग्णांची सेवा आजवर केलेली आहे. त्यामुळे या इस्पितळाला अन्यय साधारण महत्व आहे. ते महत्व जपले पाहिजे. या ठिकाणी एड्स विषयीचा विभाग सद्या कार्यरत असून जीर्णोद्धारानंतर ही या इस्पितळाचा वापर कायम ठेवला जाईल असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मोती डोंगरावरील टी बी हॉस्पिटलचा विभाग हॉस्पिसियोत स्थलांतरीत करण्याचा प्रस्ताव असून तो मार्गी लावला जाईल असे डॉक्टर म्हणाले. यावेळी हॉस्पिसियोच्या अधीक्षक डॉ. दिपा व डॉ. आयडा यांची उपस्थिती होती.

Related Stories

पंचायतीराज कायदा आता अधिक सुटसुटीत

Omkar B

शेतकऱयांच्या प्रश्नांकडे सरकारकडून दुर्लक्ष

Amit Kulkarni

बांदोडा येथील दीपोत्सव मर्यादित स्वरुपात

Patil_p

पालिका मंडळांचा कार्यकाळ महिनाभरात येणार संपुष्टात

Omkar B

हवामानात आद्रता वाढल्यामुळे बुरशीच्या प्रमाणात वाढ

Amit Kulkarni

दाडाचीवाडी धारगळ येथे उपमुख्यमंत्री बाबू आजगावाकर यांचा निषेध

Amit Kulkarni
error: Content is protected !!