तरुण भारत

ओबीसी आरक्षणात भंडारी समाजाला राखिवता द्यावी

गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांची मागणी

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

ओबीसीमधील आरक्षणात लोकसंख्येनुसार नाईक भंडारी समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी विजय सरदेसाई यांच्या नेतृत्वाखालील गोवा फॉरवर्ड विधीमंडळ पक्षाने केली आहे. हे आरक्षण लागू करण्यात भाजप सरकार अपयशी ठरल्यास नवीन सरकार बनविल्यानंतर आम्ही ते करू, असे आश्वासन सरदेसाई यांनी दिले आहे.

आमदार जयेश साळगावकर आणि विनोद पालयेकर यांच्यासह घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरकाने या विषयावर चर्चा तरी करायला हवी होती, असेही ते म्हणाले. आरक्षणाखाली असे आरक्षण देणे शक्मय असून त्या संदर्भात आम्ही कायदेशीर मत घेतले आहे. आरक्षणाबाबतीत कधीच अन्याय होऊ देऊ नये.“ असेही सरदेसाई म्हणाले.

“विधानसभेत या विषयावर आम्ही चर्चेची मागणी केली होती. ती मागणी  मुख्यमंत्र्यांनी फेटाळली. 18 जातींचा समावेश असलेल्या ओबीसीमध्ये सुमारे 61 टक्के नाईक भंडारी समाज आहे. ओबीसी मधील 27 टक्के आरक्षण सर्वांमध्ये विभागले जाते, इथे बहुसंख्य नाईक भंडारी समाज असूनही त्यांना पुरेसे प्रतिनिधित्व किंवा लाभ मिळत नाहीत.“ असे सरदेसाई यांनी निदर्शनास आणून दिले.

ही संकल्पना चालीस लावण्यास राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. भंडारी समाजासाठी हे आरक्षण किती महत्त्वाचे आहे त्याची आम्हाला जाणीव आहे. आरक्षण नसल्याने सरकारी नोकऱयांमध्ये बढतीपासून ते वंचित आहेत. त्यामुळे सरकार बनवल्यानंतर आम्ही हे आरक्षण लागू करू, असे सरदेसाई म्हणाले.

राज्यांना ओबीसींची स्वतःची यादी बनवण्याचा अधिकार

मोदी सरकारने राज्यघटनेत आणलेल्या 127 व्या दुरुस्तीनुसार राज्यांना ओबीसींची स्वतःची यादी बनवण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. त्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या दोन निर्णयानुसार मागासवर्गीय आणि सर्वाधिक मागासवर्गीय असे वर्गीकरण करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यानुसार आता गोवा सरकारनेही नाईक भंडारी समाजाला न्याय द्यावा. यात सरकारला अपयश आल्यास पुढे काय निर्णय घ्यावा त्याचा विचार समाज करेल, असे सरदेसाई म्हणाले.

भाजप हा स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणवतो. त्यात तथ्य असेल तर भाजप सरकार नाईक भंडारी समाजाच्या मागणीवर विचार करेल, अशी खात्री आहे, असे एका प्रश्नाला उत्तर देताना सरदेसाई यांनी पुढे सांगितले.

दरम्यान, हल्लीच गोवा भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी आमदार जयेश साळगावकर यांची भेट घेऊन हा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करण्याची विनंती केली होती. आमदार साळगावकर आणि विनोद पालयेकर यांनीही नाईक भंडारी समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.

Related Stories

गोवा बजेट ‘वेब पोर्टल’चा शुभारंभ

Patil_p

दाबोळीत रेलमार्गाच्या दुपदरीकरणात स्थानिकांची मालमत्ता सुरक्षीत

Amit Kulkarni

सहा महिन्यात 3 लाखाहून अधिक वाहनचालकांना दंड

Amit Kulkarni

वाळपई नगरपालिकेसाठी एकूण तीन उमेदवारी अर्ज दाखल

Amit Kulkarni

मगोला 21 आमदार द्या ,आणि मोपा प्रकल्पात सर्व प्रकारचे रोजगाराच्या संधी घ्या

Patil_p

गोव्याला का विकले याचे स्पष्टीकरण द्यावे सुरेल तिळवे यांची मागणी

GAURESH SATTARKAR
error: Content is protected !!