तरुण भारत

मागण्या मान्य करण्यास एसीजीएल व्यवस्थापन अनुत्सुक

कामगार संघटना आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता

प्रतिनिधी /वाळपई

Advertisements

 भुईपाल सत्तरी येथील येथे एसीजीएल कंपनी कामगार संघटनेच्या संपाचा आज दुसरा दिवस होता. कंपनीच्या व्यवस्थापनाकडून कामगारांच्या मागण्या मान्य करण्याबाबत विचार न केल्यामुळे संप चिघळण्याची शक्मयता आहे.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेन कामगार संघटनेचे वरिष्ट पदाधिकारी मंगळवारी उशिरा गोव्यात पोहोचण्याची शक्यता असून बुधवारी सकाळी कामगार आक्रमक भूमिका घेऊ शकतात.

आज दिवसभर संपकरी कामगारांची अनेक राजकीय नेत्यांनी भेट घेतली. तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते लुईझिन फालेरो यांनी भेट घेऊन यावेळी कामगारांशी संवाद साधला. कामगारांना संपाचे हत्यार हाती घ्यावे लागले त्याला पूर्णपणे सरकारचे चुकीचे धोरण जबाबदार आहे. सरकारने यामध्ये लक्ष घालणे गरजेचे होते मात्र तसे न झाल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

एसीजीएल कंपनीचा टाटा कंपनीशी करार आहे. कोविड काळामध्ये टाटा कंपनीने देशातील जनतेला चांगले सहकार्य केले. प्रचंड प्रमाणात निधी खर्च केला. यामुळे टाटा कंपनीचे नाव आज जागतिकस्तरावर अभिमानाने घेतले जात आहे. असे असताना एसीजीएल कंपनी कामगारावर अशा प्रकारे अन्याय करणे कितपत ठीक आहे, असा सवाल करून टाटा कंपनीला व गोवा सरकारला पत्रव्यवहार करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार असल्याचा आश्वासन यावेळी फालेरो यांनी दिले.

दरम्यान, मंगळवारपर्यंत तोडगा न काढल्यास बुधवारी कुटुंबासह रस्त्यावर उतरण्याचा इशारा कंपनीच्या कामगार संघटनेने सोमवारी दिला होता. मंगळवारी दिवसभर या संदर्भात कोणती चर्चा किंवा तोडगा निघालेला नाही. यामुळे बुधवारी कंपनीचे कामगार आक्रमक होण्याची शक्मयता आहे.  दरम्यान, या कामगार संघटनेने महाराष्ट्र नवनिर्माण सेना या कामगार संघटनेशी करार केलेला आहे. या कंपनीचे वरि÷ नेते मंगळवारी रात्री उशिरा गोव्यामध्ये पोहोचणार असून बुधवारी सकाळी ते कामगारांना मार्गदर्शन करणार आहेत.

Related Stories

आलतगा लक्ष्मी मंदिरात दागिन्यांची चोरी

Patil_p

कर्लावासियांना स्वयंपूर्णतेसाठी मार्गदर्शन

Amit Kulkarni

नागझर-कुर्टी येथील पुल वाहतूकीसाठी धोकादायक

Omkar B

भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी नव्या संस्थेच्या प्रस्तावावर विचार

Amit Kulkarni

आरोग्य मंत्र्यांनी खरे बोलणे, कोविड टेस्टींग व पारदर्शकता यांच्यावर भर द्यावा- राहुल म्हांब्रे

Patil_p

सांकवाळ येथील घरात आग लागून लाखभराचे नुकसान

Omkar B
error: Content is protected !!