तरुण भारत

सांकवाळच्या सरपंचपदी गिरीष पिल्ले यांची पुन्हा बिनविरोध निवड

प्रतिनिधी /वास्को

सांकवाळ पंचायतीच्या सरपंचपदी माजी सरपंच गिरीष पिल्ले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सांकवाळच्या सरपंचपदासाठी मंगळवारी सकाळी पंचायतीत बैठक घेण्यात आली. सरपंच पदासाठी गिरीष वगळता एकाही पंच सदस्याने अर्ज भरला नाही. त्यामुळे गिरीष पिल्ले यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

Advertisements

सांकवाळ पंचायतीच्या 2017 साली झालेल्या निवडणुकीनंतर गिरीष पिल्ले यांची प्रथमच सरपंचपदी बिनविरोध निवड झाली होती. मात्र, मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांना अविश्वास ठरावाव्दारे सरपंचपदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर रमाकांत बोरकर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच झालेल्या नाटय़पूर्ण राजकीय घडामोडीत बोरकर यांना सरपंचपद गमवावे लागले होते. अकरापैकी नऊ सदस्य त्यांच्याविरोधात गेले होते. याच नऊ सदस्यांनी गिरीष पिल्ले यांना पुन्हा सरपंचपदी निवडले आहे.

काल मंगळवारी नवीन सरपंच निवडण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी पिल्ले यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. माजी सरपंच रमाकांत बोरकर व त्यांची पत्नी पंच सुनिता बोरकर या बैठकीला उपस्थित राहिल्या नाहीत.

Related Stories

झुआरीनगरातील कंटेनमेंट झोनभोवती पोलीस सुरक्षा अधिक कडक करणार

Patil_p

मलेशिया,सिंगापूर, ब्राझील सुधारित जातीच्या फणसाच्या 450 झाडांची सत्तरीत होणार लागवड

Amit Kulkarni

जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मडगावात भेट

Amit Kulkarni

इथॅनला राष्ट्रीय रौप्य; विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत खेळण्याची मिळविली पात्रता

Amit Kulkarni

तिनही सरकारे भाजपचीच असतानाही म्हादईचा विषय झुलतच का ?

Patil_p

पिळये भुमिका देवीच्या देणगी कुपनाचा निकाल

Amit Kulkarni
error: Content is protected !!