तरुण भारत

सुदिन, प्रसाद यांचा विधानसभेत ठिय्या

लक्षवेधी सूचनेवरून सरकारला केले लक्ष्य

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

गत तीन अधिवेशनामध्ये संजीवनीसंबंधी आपण लक्षवेधी सूचना मांडत असताना आता अंतिम अधिवेशनातही ती का स्वीकारण्यात आली नाही, याचे उत्तर सभापतींनी द्यावे, अशी मागणी करत आमदार सुदिन ढवळीकर यांनी सभापतींच्या आसनासमोर ठिय्या मांडला. त्यात सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनीही त्यांना साथ दिली. जेवणाच्या सुट्टीच्या वेळीच हा प्रकार घडल्यामुळे सभापतींनी कामकाज अडीज वाजेपर्यंत स्थगित केले.

मंगळवारी प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर शुन्य प्रहरावेळी ढवळीकर यांनी संजीवनी साखर कारखान्यासंबंधी आपली लक्षवेधी सूचना का घेण्यात येत नाही, याचे स्पष्टीकरण सभापतींकडे मागितले. तत्पूर्वी प्रत्यक्ष कामकाज सुरू होण्यापूर्वीही त्यांनी याच विषयावरून हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे संतत्प बनलेल्या ढवळीकर यांनी शून्य प्रहरावेळी तो पुन्हा उपस्थित केला व सभापतींकडे स्पष्टीकरण मागितले.

त्यावर बोलताना सभापतींनी, अधिवेशन केवळ दोन दिवसांचे असल्यामुळेच सर्व लक्षवेधी सूचना घेणे शक्य झाले नाही, असे सांगितले. त्यास हरकत घेतना ढवळीकर यांनी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्या दोन लक्षवेधी सूचना तुम्ही स्वीकारल्या, आपली सूचना का स्वीकारली नाही, असा सवाल केला.

त्यानंतर सभापतींसह सर्व आमदार व मंत्री जेवणासाठी निघून गेले. मात्र ढवळीकर व गावकर हे दोघेही आमदार सभापतींच्या आसनासमोरच ठिय्या मांडून राहिले. ’शेतकरी उपाशी असताना आपण कसा जेवणार?’ असे म्हणत दोघेही तेथेच पायऱयांवर बसून राहिले. त्यावेळी दोन्ही आमदारांची समजूत काढण्यासाठी सभापती आणि मुख्यमंत्री पुन्हा सभागृहात आले व जेवणाच्या सुट्टीनंतर तुमची लक्षवेधी सूचना विचारात घेऊ, असे आस्वासन दिले. त्यानंतरच ढवळीकर व गावकर जेवणासाठी सभागृहातून बाहेर पडले.

Related Stories

वारखंडेकर मंडळातर्फे जीवनावश्यक वस्तू वितरित

Omkar B

मडगावच्या उल्हास ज्वेलर्स तर्फे उद्या पासून डायमंड ज्वेलरी प्रदर्शन

Amit Kulkarni

विश्वचषकानंतर आता इथॅन वाझ आशियाई शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठीही पात्र

Amit Kulkarni

दीपक ढवळीकर यांनी प्रियोळातून प्रचाराचा नारळ फोडला

Amit Kulkarni

पालिका निवडणुकाही अचानक जाहीर होण्याची शक्यता

Amit Kulkarni

प्रा. हरीलाल मेनन गोवा विद्यापीठाचे नवे कुलगुरू

Amit Kulkarni
error: Content is protected !!