तरुण भारत

सार्वजनिक निर्बंध सैल…वैयक्तिक निर्बंध गरजेचे

अचूक बातमी “तरुण भारत”ची, बुधवार 20 ऑक्टोबर 2021, सकाळी 9.30

● निर्बंध उठल्याने गर्दीचा महापूर येणार
● सार्वजनिक ठिकाणी स्व-निर्बंध आवश्यक
● तिसरी लाट रोखण्याची जबाबदारी प्रत्येकीची
● जिल्ह्यात नव्याने वाढले 72 रूग्ण
● सहा तालुक्यात एक अंकी वाढ
● सातारा तालुक्यात 22 रूग्ण वाढले
● फलटणला 12 तर खटावला 10 रूग्ण

Advertisements

सातारा / प्रतिनिधी :

जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा आलेख पुरता मंदावला असून राज्यशासनाकडूून दोन दिवसात निर्बंध सैल केले जात आहेत. त्यामुळे अगोदरच गर्दीने फुललेल्या बाजारपेठांमधील गर्दी आणखी वाढणार आहे. या वाढत्या गर्दीत स्व-निर्बंधांचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. दरम्यान जिल्ह्यात गेल्या 24 तासात 3 हजार 403 संशयितांची तपासणी झाली आहे. 72 रूग्णांची वाढ झाली आहे. या वाढीने जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 2.12 वर आहे.

सातारा, फलटण, खटावला दोन अंकी वाढ

जिल्ह्यात गेल्या 24 तासात 72 रूग्णांची वाढ झाली आहे. सातारा तालुक्यात सर्वाधिक 21 रूग्णांची वाढ झाली आहे. फलटण तालुक्यात 12 तर खटाव तालुक्यात 10 रूग्ण वाढले आहेत. वाईला 4, माणला 8, कोरेगांवला 3, खंडाळा 2, कराडला 7 तर जावली तालुक्यात 5 रूग्ण वाढले आहेत. पाटण, महाबळेश्वर तालुक्यात एकाही रूग्णाची नोंद नाही. अल्पवाढ होत असलेल्या तालुक्यात नियम आणखी पाळले तर एक अंकी सुरू असलेली वाढही शुन्यावर येईल.

गर्दी वाढणार…नियमांचे भान आवश्यक

राज्यातील कोरोनाचा घसरता आलेख आणि वाढते लसीकरण पाहता राज्यशासनाने निर्बंध आणखी शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय दिवाळी अवघ्या दहा दिवसांवर आली आहे. त्यामुळे बाजारपेठांमधील गर्दीत वाढ होणार हे निश्चित आहे. पर्यटनस्थळांवरील गर्दी वाढलेली आहेच. या परिस्थितीत प्रत्येकाने नियमांचे भान ठेवले तर कोरोनाची टांगती तलवार पुन्हा उचल खाणार नाही. त्यामुळे नियमांचे पालन आवश्यकच आहे.

मंगळवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 21,90,097
एकूण बाधित 2,50,578
कोरोनामुक्त 2,42,604
मृत्यू 6,393
उपचारार्थ रुग्ण 883

मंगळवारी जिल्हय़ात
बाधित 72
कोरोनामुक्त 315
मृत्यू 00

Related Stories

जिल्ह्यात सरासरी 8.2 मि.मी.पाऊस

datta jadhav

प्रतापगड भागात आढळला बारा फूट लांबीचा अजगर

Patil_p

सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांची पाणी पातळी

Abhijeet Shinde

किल्ले अजिंक्यताऱ्यावर दुसऱ्या दिवशीही अघोरी प्रकार

datta jadhav

सातारा : नव्या कृषी कायद्याने खुल्या बाजाराची कवाडे उघडी

datta jadhav

सातारा : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग, ४ हॉटेलवर बोरगाव पोलिसांची कारवाई

Abhijeet Shinde
error: Content is protected !!