तरुण भारत

भूमिपुत्र विधेयक राज्यपालांकडे संमतीसाठी पाठविणार नाही : मुख्यमंत्री

प्रतिनिधी /पणजी

गोवा भूमिपुत्र विधेयक जे मागील विधानसभा अधिवेशनात अत्यंत घिसाडघाईने संमत करण्यात आले होते त्याबाबत सरकारी यंत्रणेत अद्याप गोंधळाचे वातावरण आहे, हे स्पष्ट झाले. तथापि, सदर विधेयक राज्यपालांकडे संमतीसाठी पाठविणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत विजय सरदेसाई यांना सांगितले आणि या वादावर आता कायमचा पडदा टाकला. तत्पूर्वी या विधेयकाचे नेमके काय झाले असा लेखी सवाल महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात यांना केला असता त्यांनी त्यावर दिलेल्या लेखी उत्तरात सदर विधेयक कायदा खात्याकडे सोपविण्यात आले. कायदा खात्याने ते आता राज्यपालांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आले, अशी माहिती देण्यात आल्याने यावरुन बराच गोंधळ निर्माण झाला होता. मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी विजय सरदेसाई यांना दिलेल्या आश्वासनाने या प्रकरणावर पडदा पडला असला तरी देखील प्रशासकीय यंत्रणेमध्ये तफावत असल्याचे दिसून आले.

Advertisements

Related Stories

सत्तरी तालुक्मयात डेंगूच्या रुग्णात वाढ सात महिन्यात चाळीस रुग्ण आढळले

Amit Kulkarni

राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

Amit Kulkarni

झेडपी उमेदवारीसाठी आज ‘डेड लाईन’

tarunbharat

पोलीस स्थानकावरील हल्ला प्रकरणी उद्या सुनावणी

Patil_p

फातोडर्य़ात आज नॉर्थईस्ट युनायटेडचा सामना एसी ईस्ट बंगालशी

Amit Kulkarni

सरकारवर अवलंबून राहू नका : सरदेसाई

Omkar B
error: Content is protected !!