तरुण भारत

आर्यन खानच्या जामिनासाठी भाजप आमदाराची प्रार्थना

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबई क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात 3 ऑक्टोबरपासून अटकेत असलेल्या आर्यन खानच्या जामिनावर आज सुनावणी होणार आहे. दरम्यान, भाजप आमदार राम कदम यांनी आर्यन खानच्या जामिनासाठी प्रार्थना केली आहे.

Advertisements

राम कदम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘प्रार्थना आहे की आज आर्यन खानला जामीन मिळावा. संविधान अन् कायद्याप्रमाणे जामीन मिळणे हा एक मूलभूत अधिकार आहे. ही लढाई कोणा एका व्यक्ती विशेषच्या विरोधातील लढाई नाही. अखंड मानव जातीची ड्रग्ज विरोधी लढाई आहे. अपेक्षा होती की, महाराष्ट्र सरकार निदान या खतरनाक ड्रग्ज प्रकरणात ड्रग्ज माफियाच्या विरोधात उभे राहतील. मात्र वसूलीचा प्रभाव स्पष्ट दिसला. मेहबूबा मुफ्ती यांनी देखील आगामी निवडणुकीसाठी याचा पुरेपुर उपयोग केला. जी ड्रग्जची नशा आपल्या सर्व युवकांना बरबाद करु शकते, त्या विरोधात सर्व पक्ष आणि मानवजात एकत्र का येऊ शकत नाही. हे दु:ख आहे.

आता बदलत्या भारतात कोणी श्रीमंत, गरीब, नेता, अभिनेता नाही, सर्व समान आहेत. भविष्यात आर्यनने ज्या ड्रग्जचा कलंक त्याच्या बदनामीचे कारण झाले. त्याने ड्रग्जच्या विरोधात प्रखर लढाई उभी करुन युवकांना ड्रग्जपासून दूर करण्यासाठी काम करून संकटाचे संधीत रूपांतर करावे, असे राम कदम यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Related Stories

सिंचन घोटाळय़ाप्रकरणी अजित पवारांनी दाखल केले शपथपत्र

prashant_c

अमेरिकेच्या चार खासदारांना चीनमध्ये बंदी

datta jadhav

रक्षाबंधन : सुप्रिया सुळेंनी औक्षण करुन अजित दादांना बांधली राखी

Rohan_P

अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या 1 लाखाच्या उंबरठ्यावर

datta jadhav

हिजबुलच्या टॉप कमांडरचा खात्मा

datta jadhav

दिल्लीत भूकंपाचे सौम्य धक्के

prashant_c
error: Content is protected !!