तरुण भारत

बेळगावच्या सायकलस्वारांना सुपर रँडोन्यूएर किताब

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

बेळगाव येथील वेणुग्राम सायकलिंग क्लबच्या 5 सायकलस्वारांना सुपर रँडोन्यूएर किताब देऊन गौरव करण्यात आला. सुपर रँडोन्यूएर किताब मिळविण्यासाठी 200 कि. मी., 300 कि. मी. व 400 कि. मी. व 600 कि. मी. अशा चार टप्प्यांच्या खडतर सायकल स्पर्धा निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची गरज असते. ही स्पर्धा भारतातील वेगवेगळय़ा शहरात ऑडॅक्स इंडिया क्लबकडून दरवषी भरविली जाते. 

Advertisements

 या सायकलस्वारांनी रोज 40 ते 50 कि. मी. सायकलिंगचा सराव व इतर व्यायाम करीत स्पर्धेची तयारी केली होती. बेळगावचे सायकलस्वार डॉ. सतीश बागेवाडी, डॉ. हरप्रित कौर, राजू नायक, विजय कामत व प्रसाद परमाज यांना ऑडॅक्स इंडिया क्लबचा सुपर रँडोन्यूएर हा किताब देण्यात आला. या सर्व सायकलस्वारांना वेणुग्राम सायकलिंग क्लबच्या सदस्यांनी मार्गदर्शन केले.

Related Stories

‘त्या’ माथेफिरूंवर कारवाई करा

Patil_p

जॉय अलुकासतर्फे कॅशबॅक योजना

Amit Kulkarni

आता टपालपेटीला बसविण्यात येणार सेन्सर

Amit Kulkarni

दुर्गमभागाच्या विकासासाठी लोकमान्य प्रयत्नशील

Patil_p

भाषिक अल्पसंख्याक महामंडळाचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन

Amit Kulkarni

बेळगावमध्ये 27 ठिकाणी पार पडली टीईटी परीक्षा

Amit Kulkarni
error: Content is protected !!